

पुणे : कोथरूडमधील एका उद्योजकाचा बिहारमध्ये खून झाल्याची धक्कादायक घटना घडली. या उद्योजकास ‘सायबर बिझनेस ट्रॅप’ रचून बोलावून खून केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. याप्रकरणी पाटणा एअरपोर्ट पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असून, १७ संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे.