'स्पेशल २६'स्टाईलने चोरी करणाऱ्यांना ४८ तासांत अटक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

crime news

'स्पेशल २६'स्टाईलने चोरी करणाऱ्यांना ४८ तासांत अटक

कात्रज : सराफी व्यावसायिकास आयकर विभागाचे अधिकारी असल्याची बतावणी करुन त्यांचे अपहरण करुन तब्बल २० लाख रूपये व ३० तोळे सोने लुटणाऱ्या आरोपीना भारती विद्यापीठ पोलिसांनी (bharti univercity) अटक केली. नंदकिशोर कांतिलाल वर्मा (वय 41, रा. दत्तनगर) यांनी फिर्याद दिली होती. या घटनेची माहिती मिळताच भारती विद्यापीठ पोलिसांनी शनिवारी रात्री उशिरापर्यंत एकूण ९ जणांना अटक केली आहे. त्यांच्याकडून यातील २० लाख रुपये आणि २० तोळे सोने हस्तगत करण्यात आले आहे.

भारती विद्यापीठ परिसरात फिर्यादी नंदकिशोर वर्मा यांचा सोन्याची नथ बनवण्याचा व्यवसाय आहे. ते घरातच नथ बनवून सराफांना पुरवठा करत होते. दरम्यान, त्यांचा व्यवसाय वाढल्याने परिसरातच एक दुकान विकत घेण्याच्या विचारात होते. त्यामुळे त्यांच्याकडे भरपूर पैसे असल्याची माहिती आरोपीना होती. यावरून त्यांनी त्याच्यावर लक्ष ठेवले आणि सोनाराला लूटण्याची योजना आखली. त्यानुसार, हिंदी चित्रपट 'स्पेशल २६' प्रमाणे आरोपीनी आयकर अधिकारी बनून फिर्यादी नंदकिशोर वर्मा या सराफाला लुटले. त्यानंतर सराफाचे अपहरण करून त्याला जांभुळवाडी रस्त्यावरील स्वामी नारायण मंदिरापाशी सोडून देण्यात आले व सर्व ऐवज घेऊन पळून गेले.

घाबरलेल्या सराफाने दुसऱ्या दिवशी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता भारती विद्यापीठ पोलिसांनी तत्काळ पथके तयार करून गुन्हेगारांच्या मागावर धाडली आणि गुन्हेगारांना ताब्यात घेतले. ताब्यात घेत असताना पोलिसांवर हल्ला करण्यात आला. यातील आरोपी हे पैसे कर्ज फेडण्यासाठी वापरणार होते, असे भारती विद्यापीठ पोलिसांनी रविवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले आहे. गुन्ह्यांतील मुख्य आरोपी व्यास गुलाब यादव हा फिर्यादी यांचा मित्र असल्याचेही पोलिसांनी सांगितले.

हेही वाचा: गाळात गेलेल्या विहिरी पुन्हा दिसू लागल्या...

भारती विद्यापीठ पोलिसांनी व्यास याच्यासह शाम अच्युत तोरमल, किरणकुमार नायर, मारुती अशोकराव सोळंके, उमेश उबाळे, अशोक सावंत, सुहास थोरात, रोहित पाटील आदी एकूण ९ आरोपींना अटक केली आहे. ही कारवाई पोलीस उपायुक्त सागर पाटील, सहाय्यक पोलिस आयुक्त सुषमा चव्हाण, वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगन्नाथ कळसकर, पोलीस निरीक्षक (गुन्हे) संगीता यादव, यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अंकुश कर्चे, नितीन शिंदे, रविंद्र भोसले, रविंद्र चिप्पा, गणेश सुतार, सचिन पवार, निलेश खोमणे आदींच्या पथकाने केली.

loading image
go to top