पुणे : अपहरण झालेल्या व्यावसायिक डॉ. शिवाजी पडवळ यांची सुटका

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 17 एप्रिल 2019

आळंदी ः  चालकाच्या डोळ्यात मिरचीपूड टाकून चारचाकी गाडीचा ताबा घेत एका खासगी कंपनीच्या संचालकाचे आळंदीजवळ चऱ्होली खुर्दमधून अपहरण केल्याची घटना मंगळवारी (ता.१६) सायंकाळी साडेपाचच्या दरम्यान घडली. दरम्यान अपहृत व्यक्ती डॉ. शिवाजी पडवळ हे यवत (ता.दौंड) याठिकाणी मंगळवारी रात्री दहाच्या दरम्यान पोलिसांना आढळून आले. मात्र यातील अज्ञात दोन आरोपींचा मात्र दिघी पोलिस शोध घेत आहेत.

राठी पॉलिबॉण्ड प्रा.लि. गृपचे संचालक डॉ. शिवाजी पडवळ हे त्यांच्या होंडा सिटी कारने (एमएच१४,जिए२९३६) कंपनी सुटल्यानंतर पुण्यातील वडगाव धायरीतील निवासस्थानी जात होते. यावेळी त्यांची गाडी चऱ्होलीतील दाभाडे वस्ती येथे आल्यानंतर दुचाकीवरून आलेल्या अज्ञात दोन आरोपींनी पडवळ यांच्या गाडीचे चालक जितेंद्र मनोहर भुजंग यांच्या डोळ्यात मिरची पूड टाकली. त्यानंतर आरोपींनी पडवळ यांच्या होंडा सिटी कारचा जबरदस्ती ताबा घेत पडवळ यांचे अपहरण केले होते. आरोपींनी त्यांच्याकडील हिरो होंडा (एमएच१४,एफई५२७४) ही दुचाकी घटनास्थळीच सोडली.

या घटनेने मरकळ आणि धानोरे औद्योगिक परिसरात खळबळ उडाली. चर्चेचा विषय झाल्याने पोलिसांसाठी ही घटना आव्हान होती. दिघी पोलिस ठाण्यातील अधिकारी कर्मचारी यांनी चार पथक तयार केली आणि घटनास्थळी भेट दिल्यानंतर आरोपींच्या आणि पडवळ यांच्या शोधार्थ तपासाची सुत्रे हलविली. पिंपरी चिंचवड शहरात नाकाबंदी केली. सुरवातीला पिंपरी चिंचवड किंवा पुणे शहरात पडवळ यांना नेले असल्याचा संशयावरून शोध घेण्यात आला. मात्र दिघी पोलिसांचे एक पथक सोलापूर महामार्गावर केडगाव चौफूला भागात शोध घेत असता अपहृत डॉ. पडवळ हे पंजाबी ढाबा येथे असल्याचे त्यांचे भावाचे मोबाईलवर कळाल्याचे पोलिसांना समजले. त्यानंतर पडवळ यांना केडगाव चौफूला येथे ताब्यात घेतले. दरम्यान यातील यातील दोघा आरोपींचा शोध वरिष्ठ पोलिस निरिक्षक विवेक लावंड आणि त्यांचे सहकारी करत आहे.

डॉ. पडवळ यांना त्यांच्या कुटूंबियांच्या ताब्यात देण्यात आले. डोळ्यात मिरची पुड गेल्याने पुण्यातील रूग्णालयात उपचार घेत असल्याची माहिती दिघी पोलिसांनी दिली. दरम्यान ठेका मिळविण्याच्या कारणावरून अपहरण केल्याचा अंदाज प्राथमिक स्तरावर व्यक्त केला जात आहे. अधिक तपास दिघी पोलिस करत आहेत.

Web Title: The businessman Dr. Anand padwal kidnapped was released