पुणे : बीव्हीजी इंडियाचे चेअरमन हणमंतराव गायकवाड व त्यांना साथ देणारे बंधु डॉ. दत्तात्रेय गायकवाड यांच्या मातोश्री सिताबाई रामदास गायकवाड (वय ७०) यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्या निधनाने गायकवाड परिवारावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. .Ashadhi Wari : आषाढीवारीसाठी 'इतक्या' रुग्णवाहिका तैनात; 'बीव्हीजी'कडून वारकऱ्यांची अनोखी सेवा.गायकवाड परिवारासाठी मोठा धक्कापुणे महानगरपालिकेच्या शिक्षण मंडाळामध्ये सिताबाईंनी प्राथमिक शिक्षिका म्हणून सेवा बजावली होती. पती रामदास यांच्या निधनानंतर अत्यंत हलाकीच्या परिस्थितीमध्ये त्यांनी मोठा मुलगा हणमंतराव यांना अभियांत्रिकी विभागाचे शिक्षण दिले. धाकटा मुलगा दत्तात्रेय यांना वैद्यकीय शाखेतील डॉक्टर बनवले होते. आईच्या मार्गदर्शनामुळे भारत विकास गृप (बीव्हीजी) हा १ लाख नागरिकांना रोजगार देण्यात यशस्वी ठरल्याचे हणमंतराव गायकवाड नेहमी त्यांच्या भाषणाद्वारे सांगत असतात. आईच्या निधनानंतर बीव्हीजी परिवाराने हळहळ व्यक्त केली आहे..Hanmantrao Gaikwad: BVGचे चेअरमन हणमंतराव गायकवाड यांना 'सातारा भूषण' पुरस्कार जाहीर.सांप्रदायिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्यसेवा निवृत्तीनंतर पिंपळे गुरव परिसरात सिताबाई सांप्रदायिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करत होत्या. महिला भजन मंडळाच्या माध्यमातून त्यांनी सुधारणावादी उपक्रम राबवले. सांगवी परिसरातील बहुसंख्य नागरिकांना अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदीराचे दर्शन स्व:खर्चाने घडवले होते..महाराष्ट्रातील दहा लाख मुलांना जागतिक स्तरावर रोजगाराची संधी देणार - हणमंतराव गायकवाड.विविध क्षेत्रातून श्रद्धांजलीदेश विदेशातील उद्योग, आरोग्य, शिक्षण क्षेत्रातील त्याचबरोबर राजकीय नेत्यांनी गायकवाड कुटुंबियांना आधार देण्यासाठी सहवेदना व्यक्त केल्या आहेत..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.