
- याबाबतचे पत्रकही करण्यात आले जाहीर.
खडकवासला : जिल्ह्यातील हवेली पंचायत समितीतील निर्वाचक
गण क्रमांक 89- धायरी (तालुका हवेली) या गणाच्या रिक्त सदस्य पदांच्या पोटनिवडणुकीसाठी उद्या (गुरुवार) मतदान होणार आहे. त्यामुळे या भागात स्थानिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळच ऍप
पोटनिवडणूक असलेल्या क्षेत्रातील शाळा, महाविद्यालये, शासकीय/ निमशासकीय कार्यालय, दुकाने, अस्थापना, निवासी हॉटेल्स, खाद्यगृहे, नाट्यगृहे, व्यापार, औद्योगिक उपक्रम किंवा इतर आस्थापनांना, कामगारांना जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी भरपगारी स्थानिक सुट्टी जाहीर केली आहे. याबाबतची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रसिद्धी पत्रकाद्वारे देण्यात आली.