
पुणे : ऑनलाइन सेवा देणाऱ्या कॅबचालकांनी आपल्या विविध मागण्यांसाठी शुक्रवारी (ता. १८) सेवा स्थगित केली. मुंबईत आझाद मैदान येथे आंदोलन सुरू असतानाच अचानक पहाटेपासूनच कॅबचा संप केला. त्यामुळे पुणे विमानतळावर दाखल होणाऱ्या प्रवाशांना मोठा फटका बसला. काही कॅबचालकांकडून प्रवाशांना दमदाटी, तर काहींनी जास्तीच्या दराची आकारणी केली. कॅबचालकांनी आपल्या मागण्यांसाठी प्रवाशांना वेठीस धरल्याने प्रवाशांनी संताप व्यक्त केला.