गोंदवल्यात केबल चोरी
गोंदवल्यात केबल चोरीमुळे
पाणीपुरवठा खंडित
गोंदवले, ता. ३ : सार्वजनिक पाणीपुरवठ्याच्या विहिरीवरील विद्युत मोटारींच्या केबल चोरी झाल्याने गोंदवले बुद्रुक (ता. माण) येथील पाणीपुरवठा खंडित झाला आहे.
ग्रामपंचायतीच्या सार्वजनिक पाणीपुरवठा योजनेतून गावाला पाणीपुरवठा करण्यासाठी महाडुंगवस्ती जवळ विहीर आहे. या विहिरीवरील दोन एचपीची एक व साडेसात एचपीच्या दोन अशा तीन विद्युत मोटारींच्या केबल्स अज्ञात चोरट्यांनी गुरुवारी (ता. २६) रात्रीच्या सुमारास पळवून नेल्या. ग्रामपंचायतीचे पाणीपुरवठा कर्मचारी धनाजी माने हे शुक्रवारी सकाळी मोटार सुरू करण्यासाठी विहिरीवर गेल्यानंतर ही चोरीची घटना निदर्शनास आली. सुमारे साडेपाचशे फूट लांबीच्या विद्युत केबलांची चोरी झाल्याने गावाचा नियमित पाणीपुरवठा बंद होऊन दैनंदिन जीवन विस्कळित झाले. नवीन केबल जोडणी करण्यासाठी वेळ लागण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी पाण्याचा वापर जपून करावा, असे आवाहन ग्रामपंचायत अधिकारी संतोषकुमार माळवे केले आहे.
दरम्यान, या घटनेची तक्रार दहिवडी पोलिस ठाण्यात देण्यात आली आहे. गोंदवले परिसरातील काही शेतकऱ्यांच्याही विहिरीवरील विद्युत केबल चोरट्याने पळवल्याची चर्चा परिसरात सुरू आहे. पोलिसांकडून चोरट्यांचा शोध सुरू आहे.
----
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

