

सांडपाण्याच्या ओढ्यावरील
२०८५ फूट केबल चोरी
सोलापूर : बाळे गावाजवळील सांडपाण्याच्या ओढ्यावरील दोन हजार ८५ फूट केबल चोरट्याने चोरून नेली आहे. ७ ऑगस्टच्या रात्री तीन पदरी केबल चोरी झाल्याची फिर्याद रविचंद्र भानुदास ठोके (रा. सलगरवाडी, डोणगाव रोड, सोलापूर) यांनी सलगर वस्ती पोलिसांत दिली आहे. फिर्यादी व शेजारील शेतकऱ्यांची ती केबल असल्याचेही फिर्यादीत नमूद आहे. चोरी झालेल्या केबलीची अंदाजे किंमत ३१ हजार २७५ रुपये आहे. पोलिस हवालदार बन्ने तपास करीत आहेत.
--------------
चारचाकी वाहनाच्या धडकेत
दुचाकीस्वाराचा गुडघा फ्रॅक्चर
सोलापूर : पशुवैद्यकीय हॉस्पिटलमधील काम आटोपून दुचाकीवरून (एमएच १३, बीडब्ल्यू ८१५३) घरी जात असताना मागून भरधाव चारचाकी वाहनाने (एमएच १३, ईएक्स ०५८४) दुचाकीस्वाराला धडक दिली. २७ जुलैला सायंकाळी सहाच्या सुमारास सात रस्ता येथे हा अपघात झाला होता. यात फिर्यादी श्रीराम भागवत शिंदे (रा. अग्रवाल निवास, शिवाजी नगर, बाळे) यांच्या उजव्या पायाला गंभीर दुखापत झाली. यात त्यांच्या गुडघ्याला फ्रॅक्चर झाले. त्यांच्या फिर्यादीवरून चारचाकी चालक सोमनाथ माने याच्याविरूद्ध सदर बझार पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. पोलिस हवालदार मोरे तपास करीत आहेत.