pune news
pune newssakal

वळती येथे २५ ते ३० हजार रकमेची केबल चोरी

वळती (ता.आंबेगाव) येथील धोंडीभाऊ रामभाऊ भोर व रविंद्र विठ्ठल भोर या दोन शेतकऱ्यांच्या २५ ते ३० हजार रकमेची केबल चोरी अज्ञात चोरट्याने लंपास केल्याने मोठे नुकसान झाले आहे,ही घटना वळती येथे मीना नदी पात्रालगत सोमवार (ता.१५) रोजी रात्री घडली आहे.
Published on

Valati News : वळती (ता.आंबेगाव) येथील धोंडीभाऊ रामभाऊ भोर व रविंद्र विठ्ठल भोर या दोन शेतकऱ्यांच्या २५ ते ३० हजार रकमेची केबल चोरी अज्ञात चोरट्याने लंपास केल्याने मोठे नुकसान झाले आहे,ही घटना वळती येथे मीना नदी पात्रालगत सोमवार (ता.१५) रोजी रात्री घडली आहे.

मंगळवारी (ता.१६) रोजी सकाळी शेतकरी रविंद्र विठ्ठल भोर हे वीजपंप सुरु करण्यासाठी मीना नदी पात्रात गेले असता केबल चोरीची घटना उघडकीस आली,या घटनेमध्ये अंदाजे २५ ते ३० हजार रुपयांचे नुकसान संबधीत शेतकऱ्यांचे झाले आहे,भुरट्या चोऱ्यांचे सत्र तालुक्याच्या पूर्व भागात सुरूच आहे.

मागील काही महीन्यापुर्वी तागडेवस्ती,वाळूजमळा व भोकरवस्ती या भागातील मीना नदीच्या कडेला असणाऱ्या शेतकऱ्यांच्या वीज पंपांच्या केबल अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्या होत्या. चोरीच्या पुन्हा घटना घडू लागल्याने शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण पसरले आहे.गावाच्या नजीकच(तेल्याची वात) येथे मीना नदीवर असलेल्या कोल्हापूर पद्धतीच्या बंधार्‍यात पाणी साठ्यात अनेक शेतकऱ्यांचे कृषीपंप आहेत.

pune news
Pune Rain : सिंहगडावर तासभर पावसाच्या सरी

सध्या नदीपात्रात पाणी नसल्याने या संधीचा फायदा घेत केबल लंपास केल्या आहेत. मंगळवार(ता. १६) रोजी सकाळी रविंद्र विठ्ठल भोर हे वीजपंप सुरु करण्यासाठी गेले असता त्यांना केबलची चोरी झाल्याचे आढळून आले,त्यांनी इतर शेतकऱ्यांना घटनेची माहीती दिली,सदर घटनेत धोंडीभाऊ रामभाऊ भोर व रविंद्र विठ्ठल भोर या शेतकऱ्यांच्या केबल अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्या आहेत, केबल चोरीला गेल्याने जवळपास २५ ते ३० हजार रुपयांचे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे.

या परिसरात वारंवार केबल चोरीच्या घटना घडत असल्याने शेतकऱ्यांनी चिंता व्यक्त केली आहे.तरी पोलीस प्रशासनाने या केबल चोरांचा तपास लावून शेतकऱ्यांचे होणारे आर्थिक नुकसान टाळावे अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ( शरद पवार गट )अध्यक्ष धोंडीभाऊ भोर यांनी केली आहे.फोटो खाली ओळ वळती(ता.आंबेगाव) येथील केबल चोरी झाल्याचे दाखवताना शेतकरी रविंद्र विठ्ठल भोर.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com