prabhakar bangar and deputy collector namdev tilekar
sakal
मंचर - पुणे जिल्ह्यातील सर्व साखर कारखान्यांच्या अध्यक्ष व संचालकांची तातडीने बैठक बोलावून चालू गळीत हंगामातील उसाचा दर जाहीर करावा, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने पुणे जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. जिल्हाध्यक्ष प्रभाकर बांगर यांनी हे निवेदन दिले असून उपजिल्हाधिकारी नामदेव टिळेकर यांनी निवेदन स्वीकारले.