
पुणे : ‘‘मानवी तस्करीसारख्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी स्थानिक यंत्रणा, पोलिस, स्वयंसेवी संस्था आणि जनतेने एकत्र येऊन जनजागृती करत लोकचळवळ तयार करावी. मानवी तस्करीविरोधातील लढ्यासाठी समाजातील सर्व घटकांनी कृतिशील सहभाग घ्यावा, ही केवळ भावना नाही तर काळाची गरज आहे,’’ असे प्रतिपादन विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केले.