Canal Leakage Worsens in Jambhulkar Mala Area
sakal
घोरपडी - वानवडी येथील जांभुळकर मळा परिसरातील कालव्यातून २४ मे रोजी कमी प्रमाणात सुरू झालेली पाणी गळती आता मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. नागरिकांनी सुरुवातीपासूनच पाटबंधारे विभागाला याबाबत माहिती दिली होती. मात्र, वेळेत दखल न घेतल्याने आज मोठ्या प्रमाणावर पाणी वाहत असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे.