Pune News : कर्करोग रुग्णालयाला भिमाले यांच्या वडिलांचे नाव; स्थानिक नगरसेवकांसह भाजप नगरसेवकही अंधारात

सॅलिसबरी पार्क येथील उद्यानाला स्थायी समिती अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांच्या वडिलांचे नाव दिल्याने त्यावरून वाद उद्भावला होता.
Pune Municipal yashwantrao bhimale cancer hospital

Pune Municipal yashwantrao bhimale cancer hospital

sakal

Updated on

पुणे/बालेवाडी - सॅलिसबरी पार्क येथील उद्यानाला स्थायी समिती अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांच्या वडिलांचे नाव दिल्याने त्यावरून वाद उद्भावला होता. त्यानंतर भिमाले यांनी बाणेर येथील कर्करोग रुग्णालयालाही यशवंतराव भिमाले नाव दिले आहे. भाजपमध्ये एकमत नसतानही हे नाव दिले आहेच, पण बहुसंख्य नगरसेवकांनाही या माहिती देखील नाही. हे नाव कोणालाही विश्‍वासात न घेता लपून छपून दिल्याने यावरून नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com