esakal | दोन भरती एकाच दिवशी आल्याने उमेदवार अडचणीत
sakal

बोलून बातमी शोधा

exam

दोन भरती एकाच दिवशी आल्याने उमेदवार अडचणीत

sakal_logo
By
मिलिंद संगई ः सकाळ वृत्तसेवा

बारामती : सन 2019 मध्ये फॉर्म भरून घेण्यात आलेली प्रलंबित पोलीस भरती प्रक्रिया सध्या राज्यातील विविध जिल्ह्यामध्ये सुरू आहे. पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयात फॉर्म भरलेल्या विद्यार्थ्यांची लेखी परीक्षा व लोहमार्ग (रेल्वे) पोलीस म्हणून फॉर्म भरलेल्या विद्यार्थ्यांची लेखी परीक्षा या दोन्ही परीक्षा 17 ऑक्टोबर 2021 रोजी एकाच दिवशी आल्यामुळे ज्या विद्यार्थ्यांनी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयामध्ये व लोहमार्ग पोलीसलाही फॉर्म भरला आहे, असे हजारो विद्यार्थी कोणत्या तरी एका भरती प्रक्रियेला मुकणार आहेत.

हेही वाचा: IPL 2021: "म्हणून आम्ही हारलो"; हिटमॅनने दिली प्रामाणिक कबुली

मूळ पोलीस भरती जाहिरातीमध्ये उमेदवारांना पोलीस आयुक्तालय किंवा पोलीस अधीक्षक, लोहमार्ग पोलीस, बँडस्मन पोलीस व कारागृह विभागातील कारागृह पोलीस शिपाई अशा एकूण चार पदांसाठी आवेदन अर्ज सादर करता येत होते. त्यामुळे उमेदवारांनी पिंपरी चिंचवड आयुक्तालय व लोहमार्ग पोलीस अशा दोन्ही ठिकाणी अर्ज करणे आवश्यक असल्यामुळे मोठ्या संख्येने उमेदवाराने असे अर्ज दाखल केले होते. पिंपरी चिंचवडमध्ये आवेदन अर्ज दाखल करणाऱ्या उमेदवारांची संख्या 1,89,732 इतकी आहे. मुंबई व पुणे लोहमार्गासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांची संख्या 1,37,867 इतकी मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे उमेदवारांना नेमकी कोणती परीक्षा द्यावी असा संभ्रम निर्माण झाला आहे.

संधी हुकणार.......

विद्यार्थ्यांची हक्काची परीक्षा असताना पोलीस प्रशासनाने भरती प्रक्रियेच्या वेळापत्रकाबाबत काळजी घेणे गरजेचे होते. एकाच दिवशी दोन्ही युनिटच्या परीक्षा आल्यामुळे एका युनिटची संधी हजारो उमेदवारांची हुकणार आहे- उमेश रुपनवर, संचालक, सह्याद्री करिअर अँकॅडमी, बारामती.

loading image
go to top