esakal | वालचंदनगर येथे तीन लाखांचा गांजा जप्त 
sakal

बोलून बातमी शोधा

crime logo.jpg

वालचंदनगर (ता. इंदापूर) येथे स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग व वालचंदनगर पोलिसांनी छापा टाकून तीन लाख रुपयांचा 25 किलो गांजा जप्त केला असून याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

वालचंदनगर येथे तीन लाखांचा गांजा जप्त 

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

वालचंदनगर (पुणे) : वालचंदनगर (ता. इंदापूर) येथे स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग व वालचंदनगर पोलिसांनी छापा टाकून तीन लाख रुपयांचा 25 किलो गांजा जप्त केला असून याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

याप्रकरणी भागाबाई बबन गजघाटे (वय 50), आनंद बबन गजघाटे (रा. दोघे, वालचंदनगर), शुभम झेंडे व अनोळखी दोघे जण अशा पाच जणांवर गुन्हा दाखल केला आहे. वालचंदनगरमध्ये अमली पदार्थाच्या विक्रीसाठी गांजा आणला असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग व वालचंदनगर पोलिसांना मिळाली होती.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

शनिवार रात्री पाटीलवस्ती येथे गजघाटे यांच्या घरी छापा टाकला. यावेळी पोलिसांना 25 किलो 979 ग्रॅम वजनाचा 3 लाख 11 हजार रुपयांचा गांजा आढळला. याप्रकरणी भागाबाई गजघाटे या महिलेला वालचंदनगर पोलिसांनी अटक केली आहे.  

loading image
go to top