Cantonment News : अबब! तक्रारीकडे दुर्लक्ष केल्याने रमेश लोंढे यांनी केली ड्रेनेजच्या पाण्यात केली आंघोळ

ड्रेनेजचे पाणी वारंवार घरात शिरत असल्याने अनेकदा मनपा प्रशासनाकडे तक्रार करूनही दुर्लक्ष केल्याने स्थानिक रहिवासी रमेश लोंढे यांनी अखेर ड्रेनेच्या पाण्यात अंघोळ केली.
ramesh londhe bath in drainage water
ramesh londhe bath in drainage watersakal

कॅन्टोन्मेंट - ड्रेनेजचे पाणी वारंवार घरात शिरत असल्याने अनेकदा मनपा प्रशासनाकडे तक्रार करूनही दुर्लक्ष केल्याने स्थानिक रहिवासी रमेश लोंढे यांनी अखेर ड्रेनेच्या पाण्यात अंघोळ केली. पिण्याचे पाणी आणि ड्रेनेजचे पाईपलाईन एकाच चेंबरमध्ये असल्याने पिण्याचे पाणी अशुद्ध व दुर्गंधीयुक्त येत आहे.

या गंभीर तक्रारीकडे दुर्लक्ष करून आमचे आरोग्य धोक्यात आणण्याचे काम प्रशासन करत आहे. प्रकृती बिघडल्यास याला केवळ प्रशासन जबाबदार असणार, असे म्हणत लोंढे यांनी आपला संताप व्यक्त केला.

लोहियानगर येथे मोठ्या प्रमाणात ड्रेनेज लाईन तुडुंब भरून थेट 200 घरा-घरात पाणी शिरण्याच्या समस्याने नागरिक हैराण झाले आहे. दररोज सकाळी ७ ते २ वाजेपर्यंत परिसरात व घरात पाणी येण्यास सुरूवात होते. गेल्या दीड ते दोन वर्षापासून ही समस्या मोठ्या प्रमाणात उद्भवली आहे.

लोंढे म्हणाले की, येथील सर्व ड्रेनेज लाईन उंदीर व घुशींनी पोखरून काढल्या आहेत. गेल्या 15 वर्षापूर्वी या लाईन टाकण्यात आल्या होत्या. अनेकदा मनपा मुख्य खाते व क्षेत्रीय कार्यालयाकडे तक्रार करून ही दुर्लक्ष केले जात आहे. स्थानिक प्रतिनिधी आश्वासनाच्या पलीकडे काही काम करत नाही. फक्त वर्ष ते सहा महिन्यातून एकदा ड्रेनेज लाईन साफ केल्याचे भासविले जाते.

यावेळी छगन बुलाखे म्हणाले की, यापरिसरात लहान लहान गल्ली बोळ आहेत. त्यामुळे जेटिंग मशीन आणण्याची अडचण व कर्मचारी जागेवर नसणे अशी विविध कारणे सांगून टाळाटाळ गेली जाते. यावेळी माजी नगरसेवक संदीप लडकत, राजेंद्र काकडे, उमेश धुरांडे आदींनी नागरिकांच्या समस्येकरिता पाहणी केली.

यासंदर्भात मुख्य विभागाचे खाते प्रमुख संतोष तांदळे म्हणाले की, या परिसरात नवीन ड्रेनेज लाईन टाकण्यासाठी बजेट घेतला आहे. बजेट मान्य झाल्यावरच काम करण्यात येईल. तत्पूर्वी याकामाची देखभाल दुरुस्ती क्षेत्रीय कार्यालयाकडे देण्यात आली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com