esakal | इंडस्ट्री 4.0साठी क्षमता विकास महत्त्वाचा -  आशुतोष पारसनीस

बोलून बातमी शोधा

इंडस्ट्री 4.0साठी क्षमता विकास महत्त्वाचा -  आशुतोष पारसनीस

"इंडस्ट्री 4.0' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या डिजिटल युगातील उद्योगांसाठी केवळ तंत्रज्ञान महत्त्वपूर्ण नाही; तर उद्योगांच्या क्षमतांचा विकासही महत्त्वपूर्ण आहे, असे प्रतिपादन न्यूबॉक्‍स कंसल्टन्सीचे संस्थापक संचालक आशुतोष पारसनीस यांनी केले.

इंडस्ट्री 4.0साठी क्षमता विकास महत्त्वाचा -  आशुतोष पारसनीस

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पुणे - "इंडस्ट्री 4.0' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या डिजिटल युगातील उद्योगांसाठी केवळ तंत्रज्ञान महत्त्वपूर्ण नाही; तर उद्योगांच्या क्षमतांचा विकासही महत्त्वपूर्ण आहे, असे प्रतिपादन न्यूबॉक्‍स कंसल्टन्सीचे संस्थापक संचालक आशुतोष पारसनीस यांनी केले. राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेत आयोजित "ई दिशा-2.0' या रासायनिक उद्योगांतील परिषदेत ते बोलत होते. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल इंजिनिअरचे अध्यक्ष डॉ. संजय कांबळे, अलोक पंडित आणि "एनसीएल'चे संचालक प्रा. अश्‍विनी कुमार नांगिया यांच्या हस्ते परिषदेचे उद्‌घाटन झाले. 

पारसनीस म्हणाले, ""आजच्या उद्योगांचे स्वरूप हे भौतिकतेबरोबरच सायबर आणि पर्यावरण पूरकतेशी निगडित आहे. उत्पादनाच्या दृष्टीने स्मार्ट असलेल्या उद्योगांना संघटनात्मक आणि वैयक्तिक पातळींवर क्षमतांचा विकास करावा लागेल. तरच बदलत्या औद्योगिक पर्यावरणात आपण टिकाव धरू शकतो.'' उत्पादनाची निर्मिती करणारे "उद्योग' अशी परिभाषा आज करता येणार नाही. समस्यांचे निराकरण करणारा आणि पर्यावरणपूरक उत्पादन करणाऱ्या उद्योगांनाच "इंडस्ट्री 4.0' मध्ये महत्त्व आहे. डिजिटल युगात "उद्योगांच्या बदलत्या गरजा आणि व्यवस्थापन' याविषयी परिषदेत चर्चा करण्यात आली. परिषदेला देशभरातून उद्योगक्षेत्रातील सल्लागार, उत्पादक आणि संशोधक उपस्थित होते. 

केवळ धोरण आखण्यासाठी पैसा आणि वेळ वाया घालू नका; तर उद्योगांची कार्यसंस्कृतीत आणि सहकाऱ्यांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी जास्त वेळ द्या. इंडस्ट्री 4.0साठी तंत्रज्ञान, परस्पर सहकार्य, डेटा आणि डिजिटल जागृती, समस्या निराकरण, व्यवसाय आणि नवनिर्मिती यांवर जास्त भर देणे गरजेचे आहे. 
- आशुतोष पारसनीस, संस्थापक संचालक, न्यूबॉक्‍स कंसल्टन्सी.