चारचाकीची दुचाकीला पाठीमागून जोराची धडक; मोटरसायकलस्वराचा मृत्यू

चारचाकीची दुचाकीला पाठीमागून जोराची धडक; मोटरसायकलस्वराचा मृत्यू

Published on

चारचाकीच्या धडकेत
मोटरसायकलस्वराचा मृत्यू
.........
सांगोला, ता. २२ : भरधाव वेगाने चारचाकीने दुचाकीला पाठीमागून जोराची धडक दिल्याने झालेल्या अपघातात मोटारसायकलस्वाराचा मृत्यू झाला. हा अपघात सांगोला तालुक्यातील जुनोनी हद्दीतील सुदर्शन पेट्रोल पंपाजवळ, करंडेवाडी फाटा येथे राष्ट्रीय महामार्ग १६६ वरील पुलाशेजारी घडला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सिद्राम संजय आयवळे (वय २३, रा. मजरेवाडी, सोलापूर) याने त्याच्या ताब्यातील चिव्होरलेट कंपनीची चारचाकी (क्रमांक-एमएच-०२, बीएम-०८१५) भरधाव व निष्काळजीपणे चालवून हिरो कंपनीच्या मोटारसायकलला (क्रमांक-एमएच-४५, एए-०५३५) पाठीमागून जोराची धडक दिली. या अपघातात अजय रघुनाथ भंडारे (वय ३५, रा. पाचेगाव खुर्द, ता. सांगोला, जि. सोलापूर) यांना गंभीर दुखापत झाली असून उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. अपघातात मोटारसायकलीचे सुमारे २० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. याप्रकरणी फिर्यादी विजय रघुनाथ भंडारे
(वय २८) यांच्या तक्रारीवरून सांगोला पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस हेड कॉंन्स्टेबल घोंगडे करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com