
पुणे-सातारा महामार्गावर नसरापूर उड्डाण पुलाच्या पुढे कामथडी गावच्या हद्दीत पाठिमागे आलेल्या भरधाव कंटेनर ने ठोकरल्याने कार मधील दोन जण गंभीर जखमी झाले असून वेगाने आलेला कंटेनर कारला धडकून रस्त्यावरील दोन्ही पुलांच्या मध्ये जाऊन अडकला आहे
सर्जेराव सखाराम पाटील वय ६०, ( पत्नी ) बायक्का सर्जेराव पाटील व ५०, ( मुलगा ) प्रवीण सखाराम पाटील वय ३५, ( नात ) इरा पाटील वय साडेतीन वर्ष सर्व रा. दरेवाडी, ता. पन्हाळा, जि. कोल्हापूर अशी कारमध्ये जखमी असलेल्यांची नावे असून ही घटना पुणे - सातारा महामार्गावर देगाव फाटा ( ता. भोर ) येथे आज ता. 30 नोव्हेंबर रोजी सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास घडली आहे. सर्जेराव पाटील व त्यांची पत्नी बायका पाटील हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर नसरापूर येथील खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.