Shirur Crime : न्हावरेत कार चालकाला धमकी; मारहाण करून स्विफ्टच्या काचा फोडल्या.....

स्विफ्ट कारला कट मारल्याचा जाब विचारल्याने पांढऱ्या रंगाच्या स्कॉर्पिओमधील तरुणांनी व त्यांच्या इतर मित्रांनी स्विफ्ट कारचालक व त्याच्या चुलत भावाला शिवीगाळ करून केली मारहाण.
Car Driver Threatened in Nahavre; Assaulted and Swift Car Windows Smashed

Car Driver Threatened in Nahavre; Assaulted and Swift Car Windows Smashed

sakal

Updated on: 

न्हावरे (ता. शिरूर) - येथील न्हावरे-गुणाट रस्त्यावर स्विफ्ट कारला कट मारल्याचा जाब विचारल्याने पांढऱ्या रंगाच्या स्कॉर्पिओमधील तरुणांनी व त्यांच्या इतर मित्रांनी स्विफ्ट कारचालक व त्याच्या चुलत भावाला शिवीगाळ करून मारहाण केली. तसेच, पिस्तूल असल्याची धमकी देऊन कारच्या काचाही फोडल्या. ही घटना गुरुवारी (दि.१५) सायंकाळी घडली. या प्रकरणी एका अल्पवयीन मुलासह सहा जणांविरुद्ध शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com