Carbon Credits Currency : कार्बन क्रेडिट्स भविष्यातील चलन; ‘ईईसीसी’चे प्रा. अमिताव मल्लिक

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पुणे इंटरनॅशनल सेंटरतर्फे ‘सस्टेनेबल ॲण्ड क्लायमेट रेझिलियंट डेव्हलपमेंट फॉर इंडिया’ पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.
Carbon Credits Currency
Carbon Credits Currencysakal

पुणे : जागतिक हवामान बदलाचा फटका फक्त विकसनशील देशांना बसेल असा भ्रम होता. मात्र आता श्रीमंत देशांची अर्थव्यवस्थाही यामुळे अडचणीत आली आहे. शाश्वत विकासासाठी भविष्यातील चलन हे कार्बन क्रेडिट्स असतील, असे मत ‘पीआयसी’च्या एनर्जी एन्व्हायर्न्मेंट ॲण्ड क्लायमेट चेंज (ईईसीसी) संशोधन विभागाचे प्रमुख प्रा. अमिताव मल्लिक यांनी व्यक्त केले आहे.

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पुणे इंटरनॅशनल सेंटरतर्फे ‘सस्टेनेबल ॲण्ड क्लायमेट रेझिलियंट डेव्हलपमेंट फॉर इंडिया’ पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. पुस्तकाचे संपादक असलेल्या प्रा. मल्लिक यांच्याशी ‘सकाळ’ने संवाद साधला.

भविष्यातील पिढ्यांसाठी कार्बन उत्सर्जन कमी करण्याबरोबरच शाश्वत विकासासंदर्भात त्यांनी चर्चा केली. हवामान बदलावर आजवर अनेक जागतिक परिषदा झाल्या. मात्र प्रत्यक्ष पाऊले उचलण्यास देश कमी का पडतात, असा प्रश्न विचारले असता प्रा. मल्लिक म्हणले, ‘‘तापमानवाढीमुळे श्रीमंत देशांना मोठ्या प्रमाणावर आर्थिक फटका बसत आहे.

त्यामुळे सर्वच देश आता कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी प्रयत्न करत आहे. खनिज तेलावरील अवलंबित्व कमी करत शाश्वत विकासाच्या दृष्टीने देश विचार करत आहेत.’’ कॉर्पोरेट क्षेत्रातील शाश्वत विकासाची व्याख्या बदलण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली.

भारताची शाश्वततेकडे वाटचाल

आपली लोकसंख्या जास्त असल्याने कार्बन उत्सर्जन जास्त दिसते. पण जगाच्या तुलनेत आपले कार्बन उत्सर्जन कमी आहे. सरासरी जागतिक विकास शाश्वततेकडे चालला आहे. स्तरावरील कार्बन उत्सर्जनापेक्षा भारतातील दरडोई कार्बन उत्सर्जन हे एक पंचमांश आहे. त्यामुळे आपली वाटचाल शाश्वत पद्धतीने चालली आहे, असे प्रा. अमिताव मल्लिक यांनी सांगितले.

कार्बन बजेट मांडायला हवे

प्रा. मल्लिक म्हणाले, कार्बन हेच भविष्यातील चलन आहे. कार्बन बजेट आणि कार्बन ट्रेडिंगचीही आवश्यकता असेल. जीवाश्म इंधनांचा वापर कमी करताना अपारंपरिक ऊर्जास्रोतांचाही वापर वाढवावा लागेल. ज्यांच्याकडून जास्त कार्बन उत्सर्जन होते. अशांनी कार्बन क्रेडिट्स विकत घ्यावी, जगात ही संकल्पना रुजली आहे. याचा थेट फायदा पर्यावरणपूरक जीवनशैली असलेल्या लोकांना होईल.

ग्रीन जीडीपी

ग्राहककेंद्रित अर्थव्यवस्थेमुळे शहरीकरणाचा वेग वाढला आहे. त्यामुळे कार्बन उत्सर्जन मोठ्या प्रमाणात होते. देशाचा विकास हा सकल राष्ट्रीय उत्पन्नांच्या (जीडीपी) आधारे मोजण्याऐवजी आनंदी जीवनशैली, लोकांच्या जगण्याचा दर्जा आणि निरोगीपणावर मोजायला हवा. अशा ग्रीन जीडीपीबाबत आम्ही प्रयत्न करत आहोत, असे प्रा. मल्लिक म्हणाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com