करिअर मार्गदर्शन

करिअर मार्गदर्शन
Published on

PNE26W15558
अहिल्यानगर ः नेप्ती (ता.नगर) येथे आयोजित करिअर मार्गदर्शन कार्यक्रमात सहभागी विद्यार्थी.


यशस्वी होण्यासाठी योग्य पर्याय निवडा
प्रा. एकनाथ होले ः करिअर मार्गदर्शनाला प्रतिसाद
अहिल्यानगर, ता.२८ ः योग्य दिशा निवडल्यास यश निश्चित आहे. दहावी हा आयुष्यातील महत्त्वाचा टप्पा असून, या टप्प्यानंतर घेतलेला निर्णय पुढील करिअर घडवतो. त्यामुळे केवळ इतरांच्या सांगण्यावरून नव्हे, तर स्वतःच्या आवडीनुसार आणि क्षमतेनुसार निर्णय घ्या. प्रत्येक क्षेत्रात संधी उपलब्ध आहे. आजच्या काळात कौशल्याला जास्त महत्त्व असून, विद्यार्थ्यांनी नवीन तंत्रज्ञान आणि कौशल्ये आत्मसात करावीत, असे आवाहन प्रा. एकनाथ होले यांनी केले.
नेप्ती (ता. नगर) येथील श्री स्वामी अण्णा हजारे शिक्षण संस्थेच्या दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी “दहावीनंतर पुढे काय?” या विषयावर करिअर मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. बोर्ड परीक्षा होऊन जवळपास एक महिना उलटला असून, निकाल लवकरच जाहीर होणार असल्याने विद्यार्थ्यांमध्ये पुढील वाटचालीबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर आयोजित कार्यक्रमाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. विद्यार्थ्यांना विविध शैक्षणिक पर्यायांची सविस्तर माहिती देत योग्य निर्णय घेण्याचे महत्त्व पटवून दिले. या कार्यक्रमास मुख्याध्यापक संभाजी जाधव, प्रा. गोरक्ष कांडेकर, रामदास फुले, नानासाहेब घोडके, राजेंद्र झावरे, बाबासाहेब भोर, गोरक्षनाथ कोतकर, शिवाजी जाधव, सविता कोरडे, श्रद्धा भांड आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com