कॅरीबॅगचे कारखाने बंद

अनंत काकडे 
मंगळवार, 26 जून 2018

चिखली - प्लॅस्टिकबंदीच्या निर्णयानंतर शहरातील बहुतांशी कॅरिबॅग बनविणारे कारखाने बंद झाले आहेत. त्याचा परिणाम रोजगारावर झाला आहे. अनेक उद्योजकांनी दुसरा उद्योग सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. दुसरीकडे उद्योगांना लागणाऱ्या ५० मायक्रॉनपेक्षा अधिक जाडीच्या आणि पुनर्वापरात येणाऱ्या प्लॅस्टिकवर बंदी नसल्याने उद्योजकांचा जीव भांड्यात पडला आहे. 

मात्र, ५० मायक्रॉनपेक्षा अधिक जाडीच्या प्लॅस्टिकसाठी दीडपट अधिक पैसे मोजावे लागणार आहेत. त्यामुळे कही खुशी कही गम, अशी परिस्थिती पाहावयास मिळत आहे. 

सरकारने राज्यात २३ जूनपासून प्लॅस्टिकबंदीचा निर्णय घेतला. त्यामुळे पिंपरी, तळवडे, चिखली, कुदळवाडी, भोसरी आदी परिसरांतील कॅरीबॅग बनविणारे कारखाने बंद करण्यात आले. कुदळवाडी, तळवडे, भोसरी परिसरात कॅरीबॅग बनवण्यासाठी लागणारा कच्चा माल तयार केला जातो. मात्र, कॅरीबॅग बनविणारे कारखाने बंद झाल्याने कोट्यवधी रुपयांचा कच्चा माल पडून आहे. परिणामी कच्चा माल बनविणाऱ्या उद्योगातील शेकडो कामगारांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली आहे. तळवडे, कुदळवाडी, भोसरी, चाकण या पट्ट्यातच त्याचा विशेष परिणाम जाणवत आहे. हे कामगार आता रोजगाराच्या शोधात आहेत. 

आवरणासाठी वापरण्यात येणाऱ्या ५० मायक्रॉनपेक्षा जाड आणि पुनर्वापरात येणाऱ्या प्लॅस्टिकवर बंदी नसल्याने सरकारी परवाना असलेल्या उद्योगांवर विशेष परिणाम झालेला नाही. मात्र, त्यांना आता ५० मायक्रॉनपेक्षा अधिक जाडीचे आणि पुनर्वापरात येणारे प्लॅस्टिक तयार करावे लागणार आहे. त्यासाठी जादा पैसे मोजावे लागणार असल्याने ३० ते ४० टक्‍क्‍यांनी मागणी कमी झाल्याचे कारखानदार सांगत आहेत.

सरकारने प्लॅस्टिकबंदीचा घेतलेला निर्णय योग्य आहे. त्यामुळे कॅरीबॅग तयार करणारे उद्योग बंद झाले आहेत. त्याचा रोजगारावर काही प्रमाणात परिणाम होईल. कारखान्यांमध्ये पॅकिंगसाठी ५० मायक्रॉनपेक्षा अधिक जाडीचे प्लॅस्टिक घ्यावे लागणार असल्याने दीडपट किंमत मोजावी लागणार आहे. त्यामुळे काही प्रमाणात मागणी कमी झाली आहे. त्याचा कारखानदार, कामगार, कर्जपुरवठा करणाऱ्या बॅंका यांच्यावर परिणाम होईल.
- जितेंद्र मेहता, प्लॅस्टिक उद्योजक, कुदळवाडी

कुदळवाडी येथे प्लॅस्टिक वर्गवारी करण्याचे काम करत होतो. आता ते बंद झाल्याने दुसऱ्या कामाच्या शोधात आहे.
- रामलाल चौधरी, कामगार

Web Title: carry Bag factory closed