ओतूर - कोपरे मांडवे खोऱ्यात (ता. जुन्नर) दरवर्षी प्रमाणे उन्हाळ्यात पाणी टंचाई जाणवू लागली आहे. पिण्याच्या पाण्यासाठी टँकर ने पाणीपुरवठा काही वस्त्यांवर सुरू झाला असला तरी कधी या भागातील महिलांची हंडाभर पिण्याच्या पाण्यासाठीची वणवण कधी थांबणार? हा यश प्रश्न नेहमीच उभा ठाकला आहे.
महिला सकाळी साडेसात वाजेपर्यंत बनकरफाटा या ठिकाणी शेतमजुरी मिळवण्यासाठी येतात त्यानंतर पुन्हा सायंकाळी आठ वाजता घरी जातात. त्यानंतर घरात पाणी भरण्यासाठी पुन्हा डोक्यावर हंडा घेऊन पाण्यासाठी भटकंती करावी लागते.
जुन्नर तालुक्याच्या उत्तरेकडील अतिदुर्गम आदिवासी भागातील कोपरे जांभूळशी, मांडवे, मुथाळणे, माळ्याचीवाडी, काठेवाडी, मुठेवाडी, बांगरवाडी, डामसेवाडी, कुडाळवाडी, डोंगरदऱ्यांमध्ये असलेल्या गावातील आदिवासी महिला, लहान मुले, वयोवृद्ध यांना वर्षांनुवर्षे पाण्यासाठी सुरू असलेला संघर्ष पाहायला मिळत आहे.
याच गावामध्ये केंद्र सरकारच्या माध्यमातून जलजीवन योजने अंतर्गत ‘हर घर जल, हर घर नल’ पाण्यासाठी जलवाहिनी टाकल्या जातात. परंतु आडातच नसेल तर पोहऱ्यात कुठून येणार या भावनेने नदीतच पाणी नसेल तर नळाला पाणी कुठून येणार असा प्रश्न आदिवासी बांधव विचारात आहे.
प्रशासनाकडून योजना राबविण्याचा कागदोपत्री केविलवाणी प्रयत्न मात्र जोरदार सुरू आहे. पावसाळ्यामध्ये इतका प्रचंड प्रमाणात पाऊस पडतो की परिसर निसर्ग सौंदर्याने अगदी नटून जातो ते पाहण्यासाठी पर्यटक देखील गर्दी करतात.
परंतु पाणी अडवण्यासाठी कुठेही धरण नसल्यामुळे प्रशासनाच्या शून्य नियोजनामुळे, राजकीय उदासीनता, लोकप्रतिनिधीनी जाणीवपूर्वक केलेला काणाडोळा या कारणांमुळे उन्हाळ्यामध्ये मात्र मांडवी नदी कोरडीठाक पडलेली पाहायला मिळते.
एमआय टॅंक हाच रामबाण उपाय
कोपरे, मांडवे, मुथाळणे, जाभूळशी ही चार गावे व त्यांच्या वाड्यावस्त्या मिळून जवळपास आठ हजारांपेक्षा जास्त लोकसंख्या असून, या ग्रामस्थांची एमआय टॅंक व्हावा अशी प्रमुख मागणी आहे. टॅंक झाला तर या भागातील वर्षांनुवर्षे असलेली पाण्याची वणवण थांबेल आणि या गावांमध्ये ही हरितक्रांती होऊन या भागाचा विकास होईल तसेच रोजगार मोलमजुरी साठी होणारी नागरिकांची भटकंती थांबेल.
राजकारणी व लोकप्रतिनिधींनी वेळ
स्वातंत्र्यपूर्व काळापासून ते आजतागायत पिण्याच्या पाण्यापासून दुर्दैवाने प्रत्येक उन्हाळ्यात अडचणीत येतात. कोपरे मांडवे खोऱ्यातील दुर्गम भागातील आदिवासी बांधवांच्या व्यथा जाणून घेण्यास जिल्हा व तालुका प्रशासन राजकारणी व लोकप्रतिनिधींनी वेळ मिळत नाही.
विशेष म्हणजे या गावापैकी कोपरे जांभूळशी ही गाव शिरूरचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी दत्त घेतले होते. पाच वर्षांचा कार्यकाल पूर्ण होऊन ते परत खासदार झाले मात्र या गावातील नागरिकांची एमआय टॅंक व्हावा ही मागणी प्रलंबितच राहीली आहे.
कृष्णा लवादामुळे प्रमाणपत्र होईना उपलब्ध
जुन्नर तालुक्यातील कोपरे मांडवे खोऱ्यात मांडवी नदीवर एमआय टॅंक बांधण्यास तांत्रिक अडचण ही नाशिक येथील मिरी या संस्थेने चिल्हेवाडीचे धरण करताना असा अहवाल दिला की, यापुढे जुन्नर तालुक्यातील मांडवी नदीवर पाणी (वॉटर अकाऊंट) शिल्लक नसल्याने नदीवर छोटे मोठे कोणतेही धरण बांधता येणार नाही, असा अहवाल सादर केला. त्यामुळे कृष्णा लवादामुळे पाणी परवानगी प्रमाणपत्र उपलब्ध होत नाही.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.