Pune News : शंकर महाराज समाधी ट्रस्टवरील गुन्हा रद्द
Construction Case : धनकवडी येथील श्री सद्गुरू शंकर महाराज समाधी ट्रस्टच्या माजी विश्वस्तांवर २०१६ मध्ये दाखल केलेला गुन्हा न्यायालयाने फेटाळला असून, बांधकाम कायद्यानुसार नियमित झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
पुणे : धनकवडीतील श्री सद्गुरू शंकर महाराज समाधी ट्रस्टच्या माजी विश्वस्तांवर २०१६ मध्ये दाखल केलेला गुन्हा प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांच्या (मनपा) न्यायालयाने फेटाळून लावला.