नजरेला नजर भिडताच झाला राडा; शाहरुखने दिली तक्रार

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 18 सप्टेंबर 2019

हॉटेलमध्ये नाष्टा करताना समोरच्या टेबलावर बसलेल्याकडे बघितल्याच्या कारणावरून चौघांनी एकाला मारहाण केल्याची घटना कोंढवा येथे गंगाराम रस्त्यावर घडली. 
 

पुणे : हॉटेलमध्ये नाष्टा करताना समोरच्या टेबलावर बसलेल्याकडे बघितल्याच्या कारणावरून चौघांनी एकाला मारहाण केल्याची घटना कोंढवा येथे गंगाराम रस्त्यावर घडली. 

शाहरूख शब्बीर शेख (वय २४, रा. इंडिया आर्ट कंपनी शेजारी, कोंढवा) याने यासंदर्भात कोंढवा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अज्ञात चौघांवर याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शाहरूख आणि त्याचे तीन मित्र गंगाधाम रस्त्यावरील शिवशंभो अमृततुल्य स्नॅक्स येथे नाष्टा करण्यासाठी गेले होते. त्यावेळी त्यांच्या समोरच्या टेबलावर चौघेजण बसले होते. शाखरूखने त्यांच्याकडे पाहिल्याने या चौघांनी 'आमच्याकडे काय बघतो ' असे विचारत शिवीगाळ सुरू केली. शाखरूख व त्याच्या मित्रांनी त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्यांनी हाताने मारहाण सुरू केली, तर एकाने पाण्याच्या मगने कानावर आणि डोक्यात मारल्याने शाहरूख जखमी झाला.

पुढील तपास कोंढवा पोलिस करत आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Case file against four for beating man in pune