पुणे : वाहन नसताना पीयूसी काढला अन् गुन्हा दाखल झाला

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 18 सप्टेंबर 2019

पीयूसी तपासणी करताना वाहन तेथे असने गरजेचे असते, पण डेक्कन येथील एका व्यावसायिकाने गाडी नसतानाही त्याची पीयूसी काढून दिल्याचा प्रक्रार समोर आला आहे. या प्रकरणी डेक्कन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

पुणे : पीयूसी तपासणी करताना वाहन तेथे असणे गरजेचे असते, पण डेक्कन येथील एका व्यावसायिकाने गाडी नसतानाही त्याची पीयूसी काढून दिल्याचा प्रक्रार समोर आला आहे. या प्रकरणी डेक्कन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

संगमेश्वर पीयूसी सेंटरच्या चालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. प्रादेशिक परिवहन विभागातील सहाय्यक परिवहन अधिकारी दत्तात्रय सांगोलकर यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चार दिवसांपूर्वी संगमश्वर पीयूसी सेंटरमध्ये एकजण पीयूसी चाचणीसाठी गेला. वाहनचालकाने पीयूसी केंद्रचालकाला त्याचा वाहन क्रमांक सांगून त्याचे १४ सप्टेंबर २०१९ ते १३ मार्च २०२० आणि १३ मार्च २०२० ते १२ सप्टेंबर २०२० या कालावधीसाठी बनावट पीयूसी प्रमाणपत्र दिले.

वाहनचालकाने याविरोधात प्रादेशिक परिवहन विभागाकडे तक्रार केली. त्यानूसार  केंद्र चालकावर शासनाची फसवणुक केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलिस कर्मचारी आर. एस. वारुळे करत आहेत.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Case file against owner for issuing PUC certificate without vehicle in pune

टॅग्स