टिकटॉक व्हिडिओ पाहत थांबलेल्यावर सांगवीत गोळीबार; दोघांवर गुन्हा दाखल

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 5 ऑक्टोबर 2019

पिंपरी : दुचाकीवरुन आलेल्या आरोपींनी युवकावर गोळीबार केल्याची घटना जुनी सांगवी येथे घडली. याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल आहे. रोशन सोळंकी, चैतन्य कदम अशी आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी राजकिरण गोकुळ घुटे (वय 16) याने फिर्याद दिली आहे.

शुक्रवारी (ता.4) रात्री साडेआठच्या सुमारास फिर्यादी राजकिरण व त्याचा मित्र रितीकेश गोहिरे हे दोघे जुनी सांगवीतील गंगोत्री निवास येथे मोबाईलमध्ये टिकटॉक व्हिडीओ पाहत उभे होते. त्यावेळी आरोपी सोळंकी व कदम दुचाकीवरुन त्याठिकाणी आले. कदम दुचाकी चालवित होता तर, रोशन मागे बसला होता. दरम्यान, कदमने दुचाकीचा वेग कमी केला तर, सोळंकी याने त्याच्याकडील पिस्तुलातून राजकिरण याला जीवे मारण्याच्या उद्देशाने त्याच्या दिशेने दोन वेळा गोळ्या झाडल्या.

घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. सांगवी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.  

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Case File against two for firing in sangavi