Crime
sakal
पुणे - पर्वती परिसरातील एका खासगी अभ्यासिका व ग्रंथालयात अनधिकृतपणे प्रवेश करून तोडफोड केल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन नगरसेवकांसह सात ते आठ जणांविरोधात पर्वती पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अभ्यासिका व ग्रंथालयातील साहित्याचे नुकसान करणे, चोरी करणे तसेच जाब विचारणाऱ्या फिर्यादीला जातीवाचक शिवीगाळ केल्याचे तक्रारीत नमूद आहे.