पडळकर यांच्याविरुद्ध बारामतीत गुन्हा दाखल; राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 25 June 2020

भाजपचे नवनिर्वाचित आमदार गोपीचंद पडळकर यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याविरुद्ध केलेल्या विधानानंतर बारामती शहर पोलिस ठाण्यात आज (ता. २५) गुन्हा नोंदविण्यात आला.

बारामती : भाजपचे नवनिर्वाचित आमदार गोपीचंद पडळकर यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याविरुद्ध केलेल्या विधानानंतर बारामती शहर पोलिस ठाण्यात आज (ता. २५) गुन्हा नोंदविण्यात आला.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शहर व तालुका अध्यक्षांनी बारामती शहर पोलिसांना या संदर्भात निवेदन सादर केले होते. त्यांच्या निवेदनाची दखल घेऊन बारामती शहर पोलिसांनी आज पडळकर यांचे विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. यासंदर्भात बारामती शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक अध्यक्ष अमर धुमाळ यांनी बारामती शहर पोलिसात फिर्याद नोंदवली आहे. पोलिस निरीक्षक औदुंबर पाटील यांनी पडळकर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केल्याच्या वृत्ताला दुजोरा दिलेला आहे. भारतीय दंड संविधानाच्या कलम ५०५(२) अन्वये पडळकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.
---------
डॉ. कोल्हे यांच्या पाठपुराव्याला यश, कोरोना चाचण्यांची संख्या वाढणार
---------
पाकिस्तानवर मोठी नामुष्की; 'या' यादीतील नाव कायम
---------
दरम्यान, पंढरपूर येथे गोपीचंद पडळकर यांनी शरद पवार यांच्याविरोधात केलेल्या विधानाचे पडसाद सगळीकडे उमटले आहेत. आज बारामतीतदेखील राष्ट्रवादीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी पोलिस निरीक्षक औदुंबर पाटील यांची भेट घेऊन आपल्या संतप्त भावना व्यक्त करीत पडळकर यांचे विरुद्ध गुन्हा दाखल करण्याची जोरदार मागणी केली होती. पोलिसांनी याची दखल घेत आज पडळकर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. 

राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक
नगराध्यक्ष पोर्णीमा तावरे, पंचायत समिती सभापती नीता बारवकर, गटनेते सचिन सातव, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष संभाजी होळकर, शहराध्यक्ष इम्तियाज शिकीलकर, युवक अध्यक्ष अमर धुमाळ, महिला अध्यक्ष वनिता बनकर व अनिता गायकवाड, बाळासाहेब तावरे, मदन देवकाते, नवनाथ बल्लाळ, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विश्वास देवकाते, माजी नगराध्यक्ष योगेश जगताप व सुभाष सोमाणी यांनी जोपर्यंत पडळकर यांचे विरुद्ध गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत आपण पोलिस ठाण्यातून जाणार नाही अशी भूमिका घेतली. अखेर, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा आक्रमक पवित्रा लक्षात घेता पोलिसांनी गोपीचंद पडळकर यांचे विरुद्ध गुन्हा दाखल करण्याचा निर्णय घेतला.

शरद पवार यांच्याविरुद्ध शब्द अयोग्य
भारत सरकारने ज्येष्ठ नेते शरद पवार यांना पद्मविभूषण पुरस्कार दिलेला आहे, अशा सन्मान्य व्यक्तीचा अवमान करण्याचा अधिकार कुणालाही दिलेला नाही, राष्ट्रवादी काँग्रेसच्या देशभरातील कार्यकर्त्यांच्या भावना याच्यामुळे दुखावल्या गेल्या आहेत. त्यामुळे पडळकर यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करणे आवश्यक आहे, अशी भूमिका राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी घेतली होती.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: case filed against gopichand Padalkar in Baramati