पहिल्या बायकोचा संशयास्पद मृत्यू, दूसरीचा पैशांसाठी छळ तर तिसरीला...

womencrime
womencrime
Updated on

शिक्रापूर (पुणे) : पहिल्या पत्नीचा संशयास्पद मृत्यू, दूसरीचा हुंड्यासाठी छळ आणि याच वेळी तिसरी महिला पत्नीसारखी घरात ठेवून घेणा-या करंदी (ता.शिरूर) येथील प्रशांत कैलास नप्ते याच्यासह पाच जणांवर शिक्रापूर पोलिसांनी नुकताच विवाहितेच्या छळाचा गुन्हा दाखल केला. दरम्यान, पहिल्या पत्नीच्या संशयास्पद मृत्यूची चौकशीही तात्काळ करावी अशी मागणीही तक्रारदार जयश्री नप्ते यांनी केल्याने त्यांनी प्रकरणाची फाईल तपासकामी मागावून घेतल्याचे शिक्रापूर पोलिसांनी सांगितले.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

याबाबत अधिक माहिती देताना पोलिसांनी सांगितले की, फिर्यादी जयश्री यांचे प्रशांत नप्ते यांच्याशी जानेवारी २०१५ मध्ये लग्न झाले. लग्नाच्या पहिल्या महिन्यानंतर लगेच सासू शारदा, सासरा कैलास यांनी छळ करायला सुरवात केली व घरातील खाण्यापिण्याचे पदार्थही ते लपवून ठेवू लागले. पती प्रशांत व सासरे कैलास यांनी तर दारु पिऊन माहेरुन पैसे आणावेत म्हणून शिवीगाळ-दमदाटी सुरू केली. दरम्यान प्रशांतच्या पहिल्या पत्नीपासून झालेल्या दोन मुलांना घेवून जयश्री व प्रशांत हे चौघे भोसरी (पुणे) येथे रहायला गेल्यावर तिथे नणंद पल्लवी जितेंद्र हरगुडे व नंदावा जितेंद्र हरगुडे (रा.आंबेगाव खुर्द) हे दोघे येवू लागले व त्यांनीही शिवीगाळ, मारहाण करुन छळ करायला सुरवात केली.

साधारण एक वर्षानंतर पहिल्या पत्नीची दोन मुले यांना जयश्री पासून दूर ठेऊन पती, सासू-सासरे व नणंद-नंदावा यांनी सर्वांनी एकत्रितपणे अधिक छळ करायला सुरवात केली व लग्नात काहीच दिले नाही म्हणून भांडी व पैसे मागायला सुरवात केली. याच दरम्यान लग्नात माहेरकडून आलेले सर्व दागिने प्रशांत यांनी मोडून टाकून जयश्री हिचा छळ वाढविला. या सर्वांना कंटाळून जयश्री माहेरी आल्यावर प्रशांत यांनी स्नेहल गोकुळे नामक एका अपत्यासह असलेल्या महिलेला पत्नीसारखे घरी ठेवून घेतले. या सर्व लेखी तक्रारीच्या अनुषंगाने व कौटुंबीक वादाच्या पार्श्वभूमिवर जिल्हा पोलिसांच्या भरोसा सेल मध्ये फौजदार जयश्री कुटे (रांजणगाव पोलिस स्टेशन) यांनी प्रशांत व जयश्री यांचा संसार पुन्हा सुरळीत होण्यासाठीचे प्रयत्न केले. मात्र जयश्री नप्ते यांच्या ठाम भूमिकेने सदर फिर्याद दाखल झाली असून पाचही आरोपींना लवकर अटक करणार असल्याची माहिती तपास अधिकारी आदीनाथ शिंदे यांनी दिली.

पहिल्या पत्नीच्या मृत्यूची फाईल मागविणार
तक्रारदार जयश्री नप्ते यांच्या तक्रारीवरुन आरोपी प्रशांत नप्ते याची पहिली पत्नी प्रज्ञा नप्ते हीचा अपघाती मृत्यू सन २०१४ मध्ये झाला. प्रशांत नप्ते यांचा स्वभाव आणि वर्तणूकीनुसार सदर मृत्यू संशयास्पद असून त्याची चौकशी करण्याची मागणी जयश्री नप्ते यांनी शिक्रापूर पोलिसांकडे केली. त्यानुसार दिवंगत प्रज्ञा नप्ते यांच्या अपघाती संशयास्पद मृत्यूची आणि त्याच्या तपासाची सर्व माहिती आम्ही मागवित असल्याचे तपास अधिकारी आदीनाथ शिंदे यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Devendra Fadnavis
Traffic Reform: Pune Police Ease Restrictions for RMC Mixer Vehicles on Select Days
Exemplary Patriotism: 84-Year-Old Retired Teacher Donates ₹1 Crore for Soldiers' Welfare
High-Octane Chase: Narayangaon and Shirur Police Deploy Heavy Force After Highway Shootout
Marathi News Esakal
www.esakal.com