esakal | शरद पवारांच्या आधीच केला पुतळ्याच्या अनावरणाचा प्रयत्न; पडळकरांवर गुन्हा दाखल
sakal

बोलून बातमी शोधा

 case Filed against Padalkar for Attempt to unveil statue of AhilyaBai Holkar Sharad pawar

जेजुरी गडावर आज सकाळी तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पहाटे पडळकर आणि त्याचे काही कार्यकत्यांनी गडावर जाऊन पुतळ्याभोवती फुलांची सजावट करण्याचा प्रयत्न केला.

शरद पवारांच्या आधीच केला पुतळ्याच्या अनावरणाचा प्रयत्न; पडळकरांवर गुन्हा दाखल

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पुणे : श्री. मार्तंड देवसंस्थानच्यावतीने पुण्यश्लोक अहल्यादेवी यांचा जेजुरीच्या खंडोबा गडाच्या पायरी मार्गावर पुर्णाकृती पुतळा उभारण्यात आला आहे. शनिवारी शरद पवार यांच्या हस्ते या पुतळ्याचे उदघाटन होणार आहे.मात्र त्यापुर्वीच आज शुक्रवारी पहाटे साडेपाच वाजता काही कार्यकर्त्यांच्या समवेत भाजपाचे आमदार गोपिचंद पडळकर यांनी पुतळा उदघाटनाचा स्टंट केला. अगोदर खबर मिळाल्याने जेजुरी पोलिसांना हा स्टंट रोखला.  

आमदार पडळकर यांनी पहाटे साडेपाच वाजता गडावर येऊन पुतळा अनावरण करण्याचा प्रयत्न केला.मात्र स्थानिक पोलिसांनी त्यांना रोखले.त्यांनी दुरुनच भंडारा उधळून घोषणा दिल्या.त्यानंतर ते तेथून निघून गेले. दरम्यान, पडळकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरु असल्याचे अतिरिक्त पोलिस निरिक्षक मिलिंद मोहिते यांनी सांगितली. जेजुरीत पोलिस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे.उद्या शनिवारी (ता.१३) रोजी शरद पवार यांच्या हस्ते या पुतळ्याचे अनावरण होणार आहे.    
पुण्यातील नवले पुलाचा मुद्दा पोचला संसदेत; खासदार सुप्रिया सुळेंनी उपस्थित केले प्रश्न​

''खंडोबा गडाच्या पायरीमार्गावर श्री.मार्तंड देवसंस्थानने उभारलेल्या पुण्यश्लोक अहल्यादेवी यांचा पुतळयाच्या उदघाटनाचा केलेला स्टंट चुकीचा'' असल्याचे देवसंस्थानचे मुख्य विश्वस्त सॉलिसिटर प्रसाद शिंदे व विश्वस्त शिवराज झगडे यांनी सांगितले.  

दरम्यान याबाबत देवसंस्थानचे मुख्य विश्वस्त सॉलिसिटर प्रसाद शिंदे म्हणाले की ''नियोजित कार्यक्रम शनिवारी होणार आहे.ज्येष्ट नेते शरद पवार यांच्या हस्ते अनावरण होणार आहे.त्याची तयारीही जोरदार सुरु आहे. असे असताना या कार्यक्रमात सहभागी होण्याऐवजी पहाटे अंधारात येऊन स्टंट करणे एकदम चुकीचे  आहे.''

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

loading image
go to top