
Crime News : स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय चालविणाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल
पुणे : स्पा मसाज सेंटरच्या नावाखाली वेश्याव्यावसाय सुरु असलेल्या स्पावर गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाच्या पथकाने छापा घालून तीन परदेशी तरुणींसह चौघींची सुटका केली. तसेच स्पाचा मालक व व्यवस्थापकाविरुद्ध कोंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला.
कोंढवा येथील लुल्लानगर परिसरातील एका इमारतमीध्ये "लाना स्पर्श स्पा' नावाचा स्पा सुरु होता. त्यामध्ये मसाज सेंटरच्या नावाखाली वेश्याव्यावसाय सुरु असल्याची माहिती सामाजिक सुरक्षा विभागाच्या पथकास मिळाली होती.
त्यानुसार, गुन्हे शाखेच्या पथकाने तेथे छापा घातला. त्यावेळी तेथे तीन परदेशी तरुणी व एक भारतीय तरुणी अशा चार तरुणींची पोलिसांनी सुटका केली. तसेच संबंधित स्पाचा मालक व व्यवस्थापक अशा दोघांविरुद्ध कोंढवा पोलिस ठाण्यात अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.
तर व्यवस्थापकास ताब्यात घेण्यात आले आहे. हि कारवाई वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजय कुंभार, सहाय्यक पोलिस निरीक्षक अश्विनी पाटील, अनिकेत पोटे, पोलिस कर्मचारी प्रमोद मोहिते, राजेंद्र कुमावत, बाबा कर्पे, अजय राणे, अण्णा माने, पुष्पेंद्र चव्हाण यांच्या पथकाने हि कारवाई केली.