अनाधिकृतपणे कारागृहाबाहेर वास्तव्य केल्याप्रकरणी बारामतीमध्ये एकावर गुन्हा

कल्याण पाचांगणे
Friday, 6 November 2020

बारामती तालुक्यातील शिरवली येथील प्रविण उर्फ सोन्या संजय अलगुडे याने आपली कोल्हापुर मध्यवर्ती कारागृहात (बंदी क्र. 5718) शिक्षा भोगताना मिळालेली संचित रजा संपली असताना अनाधिकृतपणे कारागृहाबाहेर वास्तव्य केले. 

माळेगाव : बारामती तालुक्यातील शिरवली येथील प्रविण उर्फ सोन्या संजय अलगुडे याने आपली कोल्हापुर मध्यवर्ती कारागृहात (बंदी क्र. 5718) शिक्षा भोगताना मिळालेली संचित रजा संपली असताना अनाधिकृतपणे कारागृहाबाहेर वास्तव्य केले. 

त्या प्रकरणी लक्ष्मण जयराम कारंडे (वय 50, व्यवसाय-नोकरी मुळ रा. मुर्टी ता.बारामती जि.पुणे) सध्या (रा. मध्यवर्ती कारागृह निवासस्थान कळंबा, कोल्हापुर ) यांनी बारामती तालुका पोलिस ठाण्यात सोन्या संजय अलगुडे यांच्या विरुद्ध फिर्याद दिली. त्या आधारे पोलिसांनी अलगुडे विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला. पोलीस हावालदार ताकवणे पुढील तपास करीत आहेत.

संपादन - सुस्मिता वडतिले  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: A case has been registered against one person in Baramati for living outside the jail illegally