सोलापूर : भाजपचा माजी जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख विरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Shrikant Deshmukh

भारतीय जनता पक्षाचा सोलापूर येथील माजी जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख याच्याविरुद्ध डेक्कन पोलिस ठाण्यात लग्नाचे आमिष दाखवून बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला.

सोलापूर : भाजपचा माजी जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख विरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल

पुणे - भारतीय जनता पक्षाचा सोलापूर येथील माजी जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख याच्याविरुद्ध डेक्कन पोलिस ठाण्यात लग्नाचे आमिष दाखवून बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. देशमुख विरुद्ध पिडीत महिलेने आरोप केले होते, त्यानंतर देशमुख विरुद्ध डेक्कन पोलिसांनी गुन्हा दाखल करुन तो सोलापुर पोलिसांकडे वर्ग केला. दरम्यान, महिलेने आरोप केल्यानंतर श्रीकांत देशमुख याने भाजप जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला होता.

याप्रकरणी एका पिडीत महिलेने डेक्कन पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानंतर श्रीकांत अप्पासाहेब देशमुख असे गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. पिडीत महिला पुण्यात राहतात. फिर्यादी महिलेची देशमुख याच्याशी ओळख झाली होती. त्यावेळी देशमुख याने त्याचे त्याच्या पत्नीसमवेत तीन वर्षांपासून मतभेद सुरु आहेत. त्यामुळे आपण पत्नीला लवकरच घटस्फोट देणार आहोत, अशी बतावणी केली होती.

त्यानंतर देशमुख याने फिर्यादी महिलेवर बलात्कार केल्याचे त्यांनी दिलेल्या फिर्यादीमध्ये नमूद केले आहे. देशमुख यांनी पिडीत महिलेस लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर बलात्कार केला, तसेच यासंदर्भात कोणाला माहिती दिल्यास फिर्यादी व त्यांच्या आईला जीवे मारण्याची धमकी दिल्याचेही त्यांच्या फिर्यादीमध्ये नमूद केले आहे. दरम्यान, याप्रकरणी डेक्कन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. त्यानंतर डेक्कन पोलिसांनी संबंधित गुन्हा पुढील तपासासाठी सोलापुर पोलिसांकडे वर्ग केला.

Web Title: Case Of Rape Registered Against Shrikant Deshmukh Former District President Of Bjp In Solapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..