Pune Porsche Accident : अग्रवाल पिता-पुत्राच्या अडचणी आणखी वाढल्या! बांधकाम व्यावसायिकाच्या मृत्यूप्रकरणी गुन्हा दाखल

Pune Porsche Accident :यामुळे अग्रवाल पिता पुत्राच्या अडचणीत आणखी वाढ होणार आहे.
vishal agarwal
vishal agarwalsakal

पुणे, ता. ६ ः कल्याणीनगर अपघात प्रकरणात अटकेत असलेले बांधकाम व्यावसायिक विशाल सुरेंद्र अग्रवाल आणि सुरेंद्र अग्रवाल या पिता पुत्रासह रामकुमार अग्रवाल यांच्यासह पाच जणांवर बांधकाम व्यावसायिकाला आयुष्य संपवण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी चंदननगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे अग्रवाल पिता पुत्राच्या अडचणीत आणखी वाढ होणार आहे.

सावकारी कर्जाला कंटाळून वडगाव शेरी येथे राहणाऱ्या ४१ वर्षीय कन्स्ट्रक्शन व्यावसायिकाने नऊ जानेवारीला राहत्या घरी स्वतःचं आयुष्य संपवलं होतं. या प्रकरणी विनय विष्णुपंत काळे यांच्यावर जानेवारीत महिन्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याच्या तपासात सुरेंद्रकुमार अग्रवाल, रामकुमार अग्रवाल, विशाल अग्रवाल, रवी हुडलाणी आणि मुकेश झेंडे यांचा सहभाग निष्पन्न झाला आहे. पोलिसांनी या गुन्ह्यात कट करणे आणि फसवणूक या दोन कलमांची वाढ केली आहे.

शशिकांत दत्तात्रेय कातोरे (वय ४१, रा. गार्डेनिया सोसायटी, वडगाव शेरी) असे जीव दिलेल्या व्यावसायिकाचे नाव आहे. या प्रकरणी दत्तात्रेय साहेबराव कातोरे (वय ६९) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार विनय काळे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. शशिकांत यांचा ‘सदगुरू इन्फ्रा’ या नावाने बांधकाम व्यवसाय होता. त्यांना व्यवसायासाठी बँकेचे कर्ज हवे होते. त्याच काळात शशिकांत यांची काळे याच्याशी ओळख झाली. ‘तुम्ही बँक लोनच्या भानगडीत पडू नका. मी तुम्हाला पैसे देतो. तुम्ही मला त्यावर पाच टक्क्यांच्या हिशोबाने परतावा द्या’ असे काळे यांनी त्यांना सांगितले. त्यानुसार शशिकांत यांनी काळेकडून कर्ज घेतले होते. त्याला ठरल्याप्रमाणे पाच टक्क्याने वेळोवेळी रोख आणि ऑनलाइन स्वरूपात पैसे दिले.

तर, तुम्हाला तुरुंगात पाठवतो

शशिकांत यांनी काही महिन्यांपूर्वी नवीन प्रकल्प सुरू केला होता. त्यासाठी त्यांनी काळेकडून पुन्हा पैसे घेतले होते. परंतु, तो प्रकल्प सुरू होवू शकला नाही. त्यानंतर काळे याने रकमेवर चक्रवाढ व्याज लावण्यास सुरुवात केली. या सर्व पैशांची मागणी सुरू केली. शशिकांतच्या घरी जाऊन त्यांना ‘आम्हाला पैसे दिले नाही तर, तुम्हाला तुरुंगात पाठवतो’ अशी धमकी दिली. याला कंटाळून शशिकांत कातोरे यांनी टोकाचा निर्णय घेतला. या प्रकरणाचा पुढील तपास चंदननगर पोलिस करत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com