Crime News : पतीच्या शासकीय कार्यालयात जाऊन धुडगूस घालणाऱ्या पत्नी व सासऱ्यासह चौघांवर येरवड्यात गुन्हा दाखल

घटस्फोटाचा राग मनात ठेवून पतीच्या शासकीय कार्यालयात जाऊन पैसे उकळण्यासाठी मारहाणीची व नोकरी घालविण्याची धमकी
case registered against four people including wife father-in-law over husband's government office molested Yerwada crime
case registered against four people including wife father-in-law over husband's government office molested Yerwada crimesakal

विश्रांतवाडी - घटस्फोटाचा राग मनात ठेवून पतीच्या शासकीय कार्यालयात जाऊन पैसे उकळण्यासाठी मारहाणीची व नोकरी घालविण्याची धमकी देत गोंधळ घालून बदनामी केल्याप्रकरणी पत्नी सासरा व इतर चार अनोळखी व्यक्तींविरुद्ध येरवडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

याप्रकरणी पीडित पतीने प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी, शिवाजीनगर पुणे येथे सीआरपीसी कलम 156(3) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यासाठी अर्ज केला होता. न्यायालयाने या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिल्यानंतर येरवडा पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला आहे.

फिर्यादी हे येरवडा येथील शासकीय भूमी अभिलेख कार्यालयात सर्वेअर म्हणून काम करतात. फिर्यादी व त्यांची पत्नी यांचा घटस्फोटासाठी न्यायालयात दावा दाखल आहे. 3 फेब्रुवारी 2023 रोजी त्यांची पत्नी नम्रता नवनाथ पोटे व नवनाथ निवृत्ती पोटे (रा. इंदापूर,पुणे )हे इतर अनोळखी चार व्यक्तींसह दुपारी एक वाजण्याच्या सुमारास त्यांच्या कार्यालयात आले.

case registered against four people including wife father-in-law over husband's government office molested Yerwada crime
Pune Crime : ओतूर पोलीसांनी हरवलेले अंदाजे चार लाख रूपयाचे १९ मोबाईल सायबर सेलच्या मदतीने शोधले

त्यांच्या कार्यालयात येऊन त्यांना घटस्फोटाच्या कारणावरून पैसे उकळण्यासाठी शिवीगाळ व गोंधळ करू लागले. तसेच त्यांना बेदम मारहाण करण्याची व नोकरी घालून कोर्टात हेलपाटे मारण्याची धमकी दिली. फिर्यादी यांची बदनामी करण्याच्या उद्देशाने त्यांच्या शासकीय कार्यालयात जाऊन त्यांची पत्नी व त्यांच्या इतर साथीदारांनी हा गोंधळ केला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

case registered against four people including wife father-in-law over husband's government office molested Yerwada crime
Pune - Bengaluru विमान १० तास झाले आलेच नाही, प्रवाशांचा गोंधळ, नाईलाजाने पोलीसांना उचलून न्याव लागलं

याप्रकरणी फिर्यादी यांनी गुन्हा दाखल करण्यासाठी शिवाजीनगर न्यायालयात अर्ज दाखल केला होता. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांनी सीआरपीसी 156 (3) प्रमाणे सदर प्रकरणी आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश येरवडा पोलिसांना दिले. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास येरवडा पोलीस करीत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com