महिलेसोबतचे अश्लील फोटो व्हायरल करणाऱया पती-पत्नीवर गुन्हा दाखल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

crime
महिलेसोबतचे अश्लील फोटो व्हायरल करणाऱया पती-पत्नीवर गुन्हा दाखल

महिलेसोबतचे अश्लील फोटो व्हायरल करणाऱया पती-पत्नीवर गुन्हा दाखल

बारामती - कामाला असलेल्या महिलेची अश्लील छायाचित्रे (Pornography) पतीसह नातेवाईकांना पाठवून बदनामी केल्या प्रकरणी शहर पोलिसांनी (Police) देवीलाला पेमाराम कुमावत व पायल देवीलाल कुमावत या दांपत्याविरुध्द गुन्हा (Crime) दाखल केला आहे. एका चोवीस वर्षीय महिलेने या बाबत फिर्याद दिली आहे.

प्रगतीनगरमध्ये राहणारी ही महिला जून 2021 पासून तिच्या पतीसमवेत देवीलाल याच्याकडे मजूर म्हणून काम करत होती. तिचे व देवीलाल यांचे सूत जुळल्यानंतर त्यांच्यामध्ये चॅटींग सुरु झाले. व्हिडीओ कॉलवर देवीलाल याने तिचे नको त्या अवस्थेतील प्रसंगाचे स्क्रीन शॉट करुन ठेवले.

नंतर सदर महिला तिच्या पतीसह इतर ठिकाणी कामासाठी गेली. मात्र त्या महिलेने आपल्याकडेच कामाला यायला हवे नाहीतर फोटो व्हायरल करण्याची धमकी देत देवीलाल व त्याच्या पत्नीने महिलेचा पती व इतर नातेवाईकांना हे फोटो पाठवले. तिची बदनामी केल्यानंतर त्या महिलेने शहर पोलिसात धाव घेत देवीलाल याच्याविरुध्द फिर्याद दिली. या फिर्यादीवरुन देवीलाल व त्याची पत्नी पायल यांच्याविरुध्द गुन्हा दाखल केला.

या दोघांविरोधात पोलिसांनी माहिती तंत्रज्ञान कायदा कलमानुसार गुन्हा दाखल केला असल्याचे पोलिस निरीक्षक सुनील महाडीक यांनी सांगितले. सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रकाश वाघमारे अधिक तपास करत आहेत.

Web Title: Case Registered Against Husband And Wife Making A Pornographic Photo With A Woman Viral Crime

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top