Theur Crime : अल्पवयीन मुलाच्या मारहाण प्रकरणात दोघांवर गुन्हा दाखल; हार्डवेअर चालकाला केले अटक

नायगाव फाटा येथून बेपत्ता झालेल्या १६ वर्षीय अल्पवयीन मुलाचा अखेर लोणी काळभोर पोलिसांनी लावला शोध.
Piyush Shinde

Piyush Shinde

sakal

Updated on

- सुनील जगताप

थेऊर - नायगाव फाटा येथून बेपत्ता झालेल्या १६ वर्षीय अल्पवयीन मुलाचा अखेर लोणी काळभोर पोलिसांनी शोध लावून त्याला सुखरूप उरुळी कांचन पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. मात्र, या प्रकरणाला आता धक्कादायक वळण मिळाले असून, बेपत्ता होण्यापूर्वी संबंधित मुलाला थेऊर फाटा परिसरातील एका हार्डवेअर दुकानात अमानुषपणे मारहाण करण्यात आल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. हार्डवेअर चालकासह एका अल्पवयीन मुलावर गुन्हा दाखल करण्यात आला असून, मुख्य आरोपीला रात्री उशिरा अटक करण्यात आली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com