Crime
sakal
पुणे - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील मुलींच्या वसतिगृहात अनधिकृतपणे प्रवेश केल्याप्रकरणी दोघा विद्यार्थ्यांवर चतुःशृंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रविवारी (ता. ११) घडलेल्या या प्रकारानंतर संतप्त विद्यार्थिनींनी वसतिगृह परिसरात ठिय्या आंदोलन करत विद्यापीठ प्रशासनाला धारेवर धरले होते.