बारामतीत भेसळयुक्त दूध विक्री प्रकरण उघड; दोघांविरुद्ध गुन्हा

बारामती एमआयडीसीतील एका कंपनीला भेसळयुक्त दूध विक्री केल्या प्रकरणी तालुका पोलिसांनी अन्न सुरक्षा कायद्यासह विविध कलमान्वये गुन्हा केला दाखल
Milk
Milksakal
Updated on

माळेगाव : बारामतीमध्ये भेसळयुक्त दूध विक्रीचे गंभीर प्रकरण उघडकीस आले आहे. बारामती एमआयडीसीतील एका कंपनीला भेसळयुक्त दूध विक्री केल्या प्रकरणी तालुका पोलिसांनी आज नगर व सातारा जिल्ह्यातील दोघांविरुद्ध अन्न सुरक्षा कायद्यासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला. त्या प्रकरणात खर्डा (ता. जामखेड, जि. नगर) येथील शिवकृपा दूध संकलन केंद्राचे मालक वैभव दत्तात्रय जमकावळे व वाहनचालक संपत भगवान ननावरे (रा. विडणी, ता. फलटण, जि. सातारा) या गुन्हेगारांचा समावेश आहे.

विशेषतः पुण्याच्या अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अन्न सुरक्षा अधिकारी शुभांगी जितेंद्र कर्णे यांच्या टिमने वरील प्रकरण उघड केले असून त्यांनीच वरील संशयित आरोपींविरुद्ध बारामती तालुका पोलिस ठाण्यात फिर्य़ाद दिली. दरम्यान, अन्न सुरक्षा अधिकारी एस. बी. अंकुश यांना वरील प्रकरणाची गोपनीय माहिती मिळाली होती.

Milk
स्थानिक स्वराज्य निवडणुका पुढे ढकलणार?;पाहा व्हिडिओ

त्यानुसार अधिकारी बी. ए. शिंदे, ए. जी. भुजबळ, जिल्हा दूध विकास अधिकारी राजेंद्र कांबळे यांच्या पथकाने ८ जुलै रोजी  कंपनी मालकासमवेत एम.एच-११ एएल-५९६२ या टॅंकरची तपासणी केली होती. त्यावेळी टॅंकरमधील दूध शिवकृपा दूध संकलन व शीतकरण केंद्र- खर्डा येथून आणल्याचे चलन चालक संपत ननावरे यांनी अधिकाऱ्यांपुढे सादर केले.  टॅंकरमध्ये साडे आठ हजार लिटर गाईचे दूध असल्याचे सांगितले होते.

सदर टॅंकरमधील तीन लीटर दूध विश्लेषणासाठी घेण्यात आले. सुरवातील जिल्हा दूध विकास विभागातर्फे कांबळे यांनी त्याची लॅबमध्ये तपासणी केली असता मानदाप्रमाणे दूध नसल्याचे आढळून आले.  त्यानंतर उर्वरित ८ हजार ४९७ लिटर दूध भेसळयुक्त आढल्याने बारामती नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱयांना सांगून ते नष्ट कऱण्यात आले. तत्कालीन अन्न सुरक्षा अधिकारी श्री. अंकुश यांनी दरम्यानच्या कालावधीत संबंधित दूधाचे नमुने राज्य आरोग्य प्रयोगशाळेच्या अन्न विलेषकांकडे पाठविले होते. त्यानुसार उपलब्ध झालेल्या अहवालात दूधामध्ये डिर्टजंट भेसळ असल्याचे अढळून आले. सहाय्यक पोलिस निरीक्षक महेश विधाते अधिक तपास करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com