पाकिस्तान जिंदाबाद घोषणांच्या कथित व्हिडिओ प्रकरणी देशद्रोहाचा गुन्हा दाखल

शिवरायांच्या भूमीत असले नारे अजिबात सहन केले जाणार नाहीत
NIA
NIAesakal
Updated on

राष्ट्रीय तपास एजन्सीनं (NIA) पुण्यासह देशभरात पॉप्युलर फ्रन्ट ऑफ इंडिया (PFI) या संघटनेवरील छापेमारीविरोधात शनिवारी पुण्यात आंदोलन केलं. यावेळी 'पाकिस्तान जिंदाबाद' आणि 'अल्लाह हूं अकबर' अशी घोषणाबाजी करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता.

दरम्यान पाकिस्तान जिंदाबाद व्हिडिओ प्रकरणातील आरोपींवर पोलिसांकडून देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानंतर पुणे पोलिसांकडून देशद्रोहाचा गुन्हा दाखल दाखल केला आहे. पुण्यात पीएफआय कार्यकर्त्यांनी आंदोलनात पाकिस्तान झिंदाबादची घोषणा दिल्याच्या एका व्हिडीओत ऐकायला मिळत आहे. या सर्व आंदोलकांवर कलम १५३,१२४, १०९, आणि १२० अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

कथित व्हिडीओचा आधार घेत गुन्हे दाखल करण्यात आला आहेत. यामुद्दावर महाराष्ट्रातील राजकारण तापले आहे. राजकीय नेत्यांनी याबाबत संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत.

दरम्यान शुक्रावारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ट्विट केले होते. पुण्यात ज्या समाजकंटकांनी पाकिस्तान झिंदाबादचे नारे दिले त्या प्रवृत्तीचा करावा तेवढा निषेध कमीच आहे. पोलीस यंत्रणा त्यांच्याविरोधात योग्य ती कारवाई करेलच, पण शिवरायांच्या भूमीत असले नारे अजिबात सहन केले जाणार नसल्याचे शिंदेंनी म्हटले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

The march demanded action on examination irregularities and called for accountability over issues affecting students.
Party workers also raised demands related to the Ayodhya Ram Temple donation issue during the programme.
Farmers received hands-on training on traditional rice cultivation techniques with support from the Maharashtra Gene Bank and agricultural experts.
The protesters have demanded immediate administrative action to remove the encroachment and reopen the road.
Marathi News Esakal
www.esakal.com