Crime
sakal
पुणे - दहिहंडी आणि गणेश उत्सवात डीजेच्या कर्णकर्कश आवाजाला पुणेकरांचा वाढता विरोध आणि पोलिसांनी घालून दिलेली ‘चार बेस, चार टॉप’ची मर्यादा ओलांडणाऱ्या १० दहीहंडी मंडळांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तर ११६ मंडळांवर थेट न्यायालयात खटले दाखल करत पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. या कारवाईदरम्यान चार प्लाझ्मा, चार प्रेशर मिडसह सहा ध्वनियंत्रणा जप्त करण्यात आल्या आहेत.