

पुणे, ता. ६ : चालू शैक्षणिक वर्षासाठी (२०२६- २७) अभियांत्रिकी, वैद्यकीय तसेच इतर व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यास तीन महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली आहे. अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग तसेच विशेष मागास प्रवर्गातील प्रवेश निश्चित झालेल्या विद्यार्थ्यांना या निर्णयाचा लाभ मिळणार आहे.
जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यास काही विद्यार्थ्यांना येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन शासनाने हा निर्णय घेतला आहे. याबाबत शासनाकडून काढण्यात आलेल्या परिपत्रकानुसार, संबंधित विद्यार्थ्यांना परिपत्रकाच्या तारखेपासून (४ सप्टेंबर) पुढील तीन महिन्यांच्या कालावधीत जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक राहणार आहे. दरम्यान, सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्ग (एसईबीसी) आणि इतर मागासवर्ग (ओबीसी) प्रवर्गातील ज्या उमेदवारांचे व्यावसायिक अभ्यासक्रमातील प्रवेश निश्चित झाले आहेत, त्यांना प्रवेशासाठी अर्ज केल्याच्या तारखेपासून सहा महिन्यांची मुदत यापूर्वीच देण्यात आली आहे.
अभियांत्रिकी, वैद्यकीयसह विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेत जात वैधता प्रमाणपत्राअभावी विद्यार्थ्यांना अडचणी निर्माण होऊ नयेत, यासाठी शासनाने ही मुदतवाढ दिली आहे. जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी देण्यात आलेली तीन महिन्यांची मुदतवाढ ही अंतिम संधी असल्याचे शासनाने स्पष्ट केले आहे. या मुदतीनंतर कोणत्याही परिस्थितीत पुन्हा मुदतवाढ दिली जाणार नसल्याचेही परिपत्रकात नमूद केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.