जुन्नर - पाळीव प्राणी आणि मानव यांच्यात एक खास संबंध असतो. या संबंधामुळेच पाळीव प्राण्यांची माणसाकडूनही विशेष काळजी घेतली जाते. अशीच एक घटना नुकतीच जुन्नरमध्ये घडली. गरोदर असलेल्या पाळीव मांजरीचे चक्क सिझेरियन बाळंतपण करून दोन पिल्लांसह या मांजरीला जीवदान मिळाले आहे. एका मनीमाऊच्या सिझेरियनची ही गोष्ट परिसरात चर्चेचा विषय झाली आहे.