बालगंधर्व रंगमंदिरात मांजरांचा ‘प्रवेश’; कलाकार, प्रेक्षक त्रस्त

बालगंधर्व रंगमंदिर आणि यशवंतराव चव्हाण नाट्यगृहामध्ये यापूर्वी उंदरांचा सर्रास वावर असल्याची बाब ‘सकाळ’ने उजेडात आणली होती.
balgandharva auditorium Pune
balgandharva auditorium Punesakal
Summary

बालगंधर्व रंगमंदिर आणि यशवंतराव चव्हाण नाट्यगृहामध्ये यापूर्वी उंदरांचा सर्रास वावर असल्याची बाब ‘सकाळ’ने उजेडात आणली होती.

पुणे - शहरातील नाट्यगृहांमधील अडचणी थांबण्याचे नावच घेत नाही. काहीच महिन्यांपूर्वी नाट्यगृहांमधील उंदरांच्या उपद्रवाने कलाकार, प्रेक्षक त्रस्त झाले असताना आता बालगंधर्व रंगमंदिरात मांजरांचा वावर दिसू लागला आहे. गेल्या काही दिवसांत ही मांजरे नाटकाचा प्रयोग सुरू असताना बिनदिक्कत रंगमंचावर आणि प्रेक्षकांमधून ये-जा करत आहेत. या प्रकाराने कलाकार, प्रेक्षक उद्विग्न झाले आहेत.

बालगंधर्व रंगमंदिर आणि यशवंतराव चव्हाण नाट्यगृहामध्ये यापूर्वी उंदरांचा सर्रास वावर असल्याची बाब ‘सकाळ’ने उजेडात आणली होती. हा उपद्रव संपत नाही तोच बालगंधर्व रंगमंदिरात आता मांजरांची नवी डोकेदुखी उघड झाली. गेल्या काही दिवसांत बालगंधर्व रंगमंदिरातील प्रत्येक प्रयोगात मांजरांचे दर्शन होत आहे. प्रेक्षकांच्या पायाखालून फिरण्यासह रंगमंचावरही ती फिरत असल्याने प्रेक्षकांसह कलाकारांचेही लक्ष विचलित होत आहे. एका प्रयोगात तर मारलेला उंदीर तोंडात धरत मांजरीने रंगमंचावर प्रवेश केल्याने प्रशासनाने उंदरांचा उपद्रव थांबवण्यासाठीच मांजरांची नेमणूक केली असावी, अशी उपहासात्मक टिप्पणी काही प्रेक्षकांनी केली.

आमच्या नाटकाच्या प्रयोगात हा अनुभव आला. एक मांजर रंगमंचाजवळून तीन-चार वेळा विंगेत गेले. मी तर ते मांजर रंगमंचावर आल्यास काय ॲडिशन घेऊन वेळ निभावून न्यायची, याचाही विचार केला होता. नशिबाने तसे घडले नाही. असे काही घडल्यास रसभंग होऊ शकतो. त्यामुळे प्रशासनाने याचा बंदोबस्त करावा, असे एका अभिनेत्रीने नाव न प्रसिद्ध करण्याच्या अटीवर सांगितले.

दोन दिवसांपूर्वी एका नाटकाचा प्रयोग पाहण्यासाठी मी बालगंधर्व रंगमंदिरात गेले होते. त्या प्रयोगात एक मांजर प्रेक्षागृहात उतरले, पुन्हा रंगमंचावर चढले, कडेने विंगेत गेले. एखाद्या गंभीर प्रसंगात मांजर रंगमंचावर आल्यास सगळ्याच रंगाचा बेरंग होतो. त्यामुळे हा अतिशय उद्विग्न करणारा प्रकार आहे.

- शुभांगी दामले, प्रेक्षक

बालगंधर्व रंगमंदिरात मांजरी फिरत असल्याची बाब अद्याप तरी आमच्या कानावर आलेली नाही. असे काही आढळून आल्यास योग्य ती पावले उचलू.

- विजय शिंदे, नाट्यगृह व्यवस्थापक

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com