
ओतूर : ता.जुन्नर येथील पोलिसांना यात्रेत मध्ये फिरून महिलेच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी करणार्या परजिल्ह्यातील टोळीला मुद्दे मालकासह अटक करण्यात यश आले असल्याची माहिती सहायक पोलीस निरीक्षक एल.जी.थाटे यांनी दिली. सुरेश गौतम चव्हाण,योगिता गणेश पवार,माया दुर्वेश पवार रा.इमामपूर ता.पैठण जि.छत्रपती संभाजी नगर असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे व पत्ता आहे.