esakal | 'तो' बहाद्दर टॅंकर आला की...त्यांचा हा उद्योग बारामती परिसरात सुरू होता पण...
sakal

बोलून बातमी शोधा

ta.jpg

राज्य उत्पादन शुल्क विभागाने बारामती तालुक्‍यात धडक कारवाई करून टँकरमधून स्पिरीट चोरुन विक्री करणार्यांना रंगेहाथ पकडले आहे.

'तो' बहाद्दर टॅंकर आला की...त्यांचा हा उद्योग बारामती परिसरात सुरू होता पण...

sakal_logo
By
सागर आव्हाड

पुणे : राज्य उत्पादन शुल्क विभागाने बारामती तालुक्‍यात धडक कारवाई करून टँकरमधून स्पिरीट चोरुन विक्री करणार्यांना रंगेहात पकडले आहे.

पुण्याच्या बातम्यांसाठी येथे क्लिक करा

या कारवाईत  स्पिरीटसह 62 लाखांचा  मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. यामध्ये सोळा चाकी टॅंकरसह चाळीस हजार लिटर स्पिरिट, प्लास्टिक कॅन जप्त केले आहे. सुपे-मोरगाव रोडवर भोंडवेवाडीच्या हद्दीत रंगीला राजस्थान ढाब्याच्या आवारात हा प्रकार सुरु होता.

दरम्यान, टँकर वाहनचालक सुखनाम सिंग हा ढाबाचालक पुखराज भार्गवला चोरीचा स्पिरीट विकत होता.  भार्गव हा चोरीचा स्पिरिट बनावट दारू आणि हातभट्टी वाल्यांना विक्री करत होता. यापूर्वीही भार्गववर याबाबतचे गुन्हे दाखल आहेत.

भार्गव हा मूळचा राजस्थानमधील असून, तो सध्या ढाबा चालवत आहे. लॉकडाउनच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाची ही मोठी कारवाई आहे. याप्रकरणी दोघांना अटक केली असून, न्यायालयात हजर केले आहे.

आणखी वाचा - महापौरांच्या कुटुंबातील आठ जण कोरोना पॉझिटिव्ह

हे स्पिरीट मध्यप्रदेशमधून केरळला जात असताना चालक हा स्पिरीट चोरून विक्री करत असे. एक्साईजचे अधीक्षक संतोष झगडे आणि विभागीय भरारी उपायुक्त प्रसाद सुर्वे यांनी ही धडक कारवाई केली 

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी पुणे जिल्ह्यातील भोंडवेवाडी गावच्या हद्दीत छापा टाकून शुद्ध मद्यार्कची अवैध पद्धतीने चोरी करून विक्री करणाऱ्यांन ताब्यात घेतले आहे.

मोरगाव-सुपा रोडवरती राजस्थान ढाबा या ठिकाणी गाडीचा चालक प्लास्टीक पाईपच्या साहय्याने टँकरमधून स्पिरीटची चोरी करत होता. आणि हे मद्यार्क राजस्थान या ठिकाणी विकलं जाणार होतं. या घटनेची माहिती मिळताच राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकास माहिती मिळताच त्यांच्यावर छापा टाकून गाडीच्या चालकासह अन्य आरोपींना तब्यात घेतले आहे. या संपुर्ण प्रकरणात उत्पादन शुल्क विभागानं 62 लाख 7 हजार 110 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. -संतोष झगडे,  अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, पुणे विभाग