Pune News : पुण्यातला अधिकारी अडकला CBIच्या जाळ्यात, बड्या आयुक्ताला लाच घेताना रंगेहात पकडलं अन्.. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

CBI

Pune News : पुण्यातला अधिकारी अडकला CBIच्या जाळ्यात, बड्या आयुक्ताला लाच घेताना रंगेहात पकडलं अन्..

सीबीआयने पुणे विभागाचे अतिरिक्त महसूल विभागीय आयुक्त अनिल रामोड यांना तब्बल 8 लाख रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडलं आहे. पहाटे 3 पर्यंत रामोड यांच्या घरी सीबीआयचा तपास सुरु होता. तपासात रामोड यांच्या घरी 6 कोटी रुपयांची रोख रक्कम सापडली आहे. तर14 बेहिशेबी मालमत्तांचे पेपर सापडले आहेत. त्याची किंमत अद्याप कळू शकलेली नाही. तर आज (10 जून) रामोड यांना न्यायालयात हजर केलं जाणार आहे. (Latest Marathi News)

मुळचे नांदेडचे असलेले रामोड हे गेल्या दोन वर्षांपासून पुण्याच्या अतिरिक्त विभागीय आयुक्त या पदावर काम करत आहेत. महामार्गावरील भूसंपादनाचा मोबदला शेतकऱ्यांना देण्यासाठी त्यांनी 8 लाख रुपयांची मागणी केली होती आणि तीच रक्कम स्वीकारताना त्यांना सीबीआयने रंगेहाथ पकडले आहे.(Latest Marathi News)

रामोड यांच्याकडे वेगवेगळ्या शासकीय कामांसाठी भूसंपादन करण्याची आणि जमिनीच्या बदल्यात शेतकऱ्यांना त्याचा मोबदला देण्याची जबाबदारी होती. पण रामोड हे शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीचा मोबदला देण्यासाठी कमिशन म्हणून लाखो रुपयांची मागणी करत होते.(Marathi Tajya Batmya)

सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील एका शेतकऱ्याला जमिनीचा मोबदला देण्यासाठी रामोड यांनी 8 लाख रुपयांची मागणी केली होती. ती स्विकारताना त्यांना रंगेहाथ पकडण्यात आलं. मिळालेल्या माहितीनुसार, हा संपूर्ण व्यवहार हायवेच्या लगत असलेल्या एका जमिनीबाबत होता. दरम्यान, या प्रकरणी आता रामोड यांना आज न्यायालयात हजर केलं जाणार आहे.(Latest Marathi News)

टॅग्स :Pune NewsCBICBI inquiry