CBSE Launches Psychological Support for Board Exams
sakal
पुणे : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई) दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी विनामूल्य मानसिक आणि सामाजिक समुपदेशन सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाद्वारे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण कल्याणासाठी आणि त्यांचे समुपदेशन करण्यासाठी आता सीबीएसईने एक पाऊल उचलले आहे. या सेवेचा पहिला टप्पा मंगळवारपासून सुरू झाला असून तो एक जूनपर्यंत असणार आहे.